शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
4
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
5
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
6
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
7
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
8
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
9
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
10
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
11
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
12
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
13
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
14
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
15
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार
16
IND vs BAN: टीम इंडियाचा Shivam Dube टी२० मालिकेतून बाहेर; Mumbai Indians च्या फलंदाजाला मिळाली संधी
17
हरियाणात भाजपाची मतं वाढणार, पण जागा घटणार; असा आहे एक्झिट पोलमधील नंबर गेम
18
IND vs BAN 1st T20: "संजू सॅमसन सलामीला खेळेल, दुसरा ओपनर म्हणून..."; सूर्यकुमार यादवने दिली मोठी माहिती
19
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
20
हार्दिकला विसरून नताशाने शोधला नवा जोडीदार? स्वीमिंग पूलमध्ये केली मौजमजा 

‘स्मार्ट सिटी’ कार्यशाळेला दमदार प्रतिसाद

By admin | Published: November 06, 2015 12:24 AM

स्मार्ट सिटी उपक्रमात अमरावती शहराचा समावेश झाल्यानंतर नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी पहिल्यांदाच

अमरावती : स्मार्ट सिटी उपक्रमात अमरावती शहराचा समावेश झाल्यानंतर नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी पहिल्यांदाच गुरुवारी कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेला अमरावतीकरांचा दमदार प्रतिसाद लाभला. यावेळी तांत्रिक एजन्सीने भविष्यातील अमरावतीचे चित्र प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून रेखाटले.येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात पार पडलेल्या कार्यशाळेचे उद्घाटन महापौर चरणजित कौर नंदा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे, आ. सुनील देशमुख, जिल्हाधिकारी किरण गित्ते, आयुक्त चंद्रकांत गुडेवार, स्थायी समिती सभापती विलास इंगोले, विरोधी पक्षनेता प्रवीण हरमकर, राष्ट्रवादी फ्रंटचे गटनेता अविनाश मार्डीकर, भाजपचे शहराध्यक्ष तुषार भारतीय, भाजपचे गटनेता संजय अग्रवाल, रिपाइंचे गटनेता प्रकाश बनसोड, बसपच्या गटनेता गुंफाबाई मेश्राम, अजय गोंडाणे, दिगंबर डहाके आदी उपस्थित होते. अतिथींचे स्वागत आयुक्त चंद्रकांत गुडेवार, सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे, प्रणाली भोंगे, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर आदींनी केले.निवड करण्यात आलेल्या जागांना हे आहे महत्व४क्षेत्र क्र.१. कठोरा मार्ग : हा अमरावतीच्या उत्तरेकडील पश्चिम भाग आहे. या भागात २५० एकर जमीन उपलब्ध आहे. अमरावती रेल्वे स्टेशन, नागपूर मार्ग व शैक्षणिक संस्था जवळ आहेत तसेच संशोधन केंद्र, कौशल्य बांधणी, अ‍ॅग्रोटेक उद्योग, युवकांच्या कौशल्य क्षमता देखील आहेत.४क्षेत्र क्र.२ रहाटगाव मार्ग : हा भाग अमरावतीचा उत्तर -पूर्व भाग आहे. या भागात ४५० एकर जमीन अधिग्रहित करता येईल. येथून टेक्सटाईल पार्क जवळ आहे. नागपूर व बडनेरा रेल्वे स्टेशन जवळ आहे. नवीन बायपास लगत हा भाग असल्याने याचे महत्त्व आहे. लघु उद्योग व टेक्सटाईल पार्क अधिनस्त असलेल्या उद्योगांचा विकास करणे आणि अप्पर वर्धा धरणातून अमरावती शहरासाठी पाणीपुरवठा करण्याची क्षमता आहे.४क्षेत्र क्र. ३. जुना एमआयडीसी भाग : हा भाग अमरावतीचा पूर्व- दक्षिण भाग आहे. ५५० एकर क्षेत्र, १९९२ नुसार औद्योगिक झोन आहे. जुने व नवीन बायपास, विमानतळ आणि बडनेरा रेल्वे स्टेशनला जोडणे, पीण, वीज आदी सुविधा आहेत. या भागात वाहतूक हब, वस्त्रोद्योग, कृषी उद्योगासाठी थेट जे.एन.पी.टी. मार्गे रेल्वे लाईन, कृषी उद्योग तसेच रहिवासी क्षेत्रासाठी आतिथ्य व सेवाक्षेत्रातील विकासाची क्षमता आहे.४क्षेत्र क्र. ४. बडनेरा : हा भाग शहराचा दक्षिण-पश्चिम भाग आहे. येथे ४५० एकर जागा नवे शहर साकारण्यासाठी उपलब्ध आहे. रिंग रोडशी संलग्न, पश्चिम रहिवासी भाग व रेल्वे स्टेशन जवळ आहे. जलशुध्दीकरण व मलशुध्दीकरण केंद्राचा विकास करण्याची मुभा, मूळ शहराशी रस्त्यामार्फत असलेली जोडणी ही कमकुवत आहे.कशी हवी स्मार्ट सिटी, इथे नोंदवा सूचना४‘स्मार्ट सिटी’ उपक्रमबाबत नागरिकांची मते, अभिप्राय समाविष्ट करण्याला प्राधान्य दिले जाईल. त्याकरीता स्वतंत्र वेबसाईट तयार करण्यात आली असून ेंं१८ू्र३८.ेंू@ॅें्र’.ूङ्मे या संकेतस्थळावर नागरिकांना मते, अभिप्राय नोंदविण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. तसेच एसएमएसची सुविधा देखील दिली आहे. अउर(रस्रंूी) (र४ॅॅी२३्रङ्मल्ल२ ळी७३ ेी२२ँी) करुन ९९७००१३१२ या क्रमांकावर संदेश पाठवावा लागेल.