शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

आदिवासी मंत्रालयात रखडलेल्या अभिछात्रवृत्तीसाठी धडपड; मुंबईत बैठक तर अमरावतीत निवेदन

By गणेश वासनिक | Published: August 23, 2022 4:45 PM

८५ कोटींचा प्रस्ताव

अमरावती : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना पी.एचडी अभ्यासक्रमासाठी आर्थिक सहाय्य मिळावे, म्हणून आदिवासी मंत्रालयात रखडलेल्या अभिछात्रवृत्तीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रविवारी भेट घेऊन ट्रायबल फोरम अमरावती जिल्हा शाखेने नुकतेच अमरावती येथे निवेदन दिले. तर दुसरीकडे सोमवार, २२ ऑगस्ट रोजी विधानभवनात विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे अध्यक्षतेखाली आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, संशोधक विद्यार्थी प्रतिनिधी यांच्यात बैठक पार पडली. आता मात्र आदिवासी विद्यार्थ्यांच्या अभिछात्रव्रुतीच्या फाईलचा प्रवास पुढे सरकण्याची चिन्हे दिसत आहेत.

आजपर्यंत आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेने अनुसूचित जमातीच्या विध्यार्थ्यांना फेलोशिप मिळावी, म्हणून कधीच प्रयत्न केलेला नव्हता. परंतु संशोधक विद्यार्थी व आदिवासी संघटनांच्या प्रचंड दबावामुळे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांनी ८५ कोटी ९ लक्ष १७ हजार रुपयांचा अभिछात्रवृत्तीचा प्रस्ताव तयार करुन १७ मार्च २०२२ रोजी शासनाकडे पाठविला होता. त्यानंतरही तो प्रस्ताव काही केल्या मंजूर होत नसल्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांनी पुणे येथील टीआरटीआय कार्यालयासमोर २ मे पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले होते. नवीन सरकार सत्तेत येताच आता मात्र अभिछात्रवृत्तीसाठी हालचाली सुरु झालेल्या आहेत. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे कार्य काय?पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था ही या सगळ्या संस्थांपेक्षा सर्वात जुनी तसेच भारतीय संविधानकृत आणि स्वायत्त संस्था असतानाही या संस्थेने अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्याना संशोधक अभिछात्रवृत्तीस प्रोत्साहन मिळावे, म्हणून कधीही प्रयत्न केलेले नव्हते. त्यामुळे आदिवासी समाजात टीआरटीआय या संस्थेचे कार्य काय? असा संताप उसळलेला होता. अखेर ट्रायबल फोरमने हा मुद्दा सातत्याने शासन दरबारी रेटला आणि आता  रखडलेल्या अभिछात्रव्रुतीचा प्रस्ताव मंजूर होईल, अशी आशा पल्लवित झाली आहे. आदिवासी समाजाच्या रुढी, परंपरा, संस्कृती यांचे जतन व संवर्धन व्हावे. यासाठी संशोधन होणे गरजेचे आहे. संशोधन करणारे विद्यार्थी पैशाअभावी अर्ध्यावरच आपले संशोधन सोडून देतात. त्यामुळे १७  ऑगस्टला उपमुख्यमंत्री व आदिवासी विकास मंत्री यांना पत्र लिहून अभिछात्रवृत्ती देण्याची मागणी केली आहे.

डॉ. संदीप धुर्वे, आमदार

टॅग्स :Educationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रAmravatiअमरावती