खासगी वाहतुकीशी स्पर्धा : लांब पल्ल्यांच्या प्रवासाची सुविधालोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी)ने प्रवाशांना लक्झरी सेवा देता यावी, याअनुषंगाने शिवशाही नावाची लक्झरी बस सेवा सुरू केली आहे. शिवशाहीने प्रवाशांना लांब पल्ल्याच्या प्रवासाचा आनंद घेता येईल. यापूर्वी हिरकणी बससेवा सुरू केली होती. मात्र शिवशाहीत अद्ययावत सुविधा असल्याने ती प्रवाशांचे आकर्षण ठरेल, असा विश्वास राज्य परिवहन महामंडळाला आहे. राज्याची जीवन वाहिनी म्हणून ओळख असलेल्या ‘एसटी’ला अलीकडे अनेक संकटातून सामना करावा लागत आहे. समस्या सोडविण्यास शासन अपयशीअमरावती : चालक, वाहकांसह अन्य कर्मचाऱ्यांचे प्रबंलित प्रश्न सोडविण्यासाठी परिवहन विभाग थकून गेला आहे. मात्र हे प्रश्न सोडविण्यात शासन अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. ‘एसटी’ला खासगी वाहतुकीसोबत स्पर्धा करताना नियमांच्या अधीन राहून उत्पन्नवाढीचे लक्ष्य गाठायचे आहे. नोकरी सुरक्षित ठेवताना कुटुंबियांची फरफट होणार नाही, हे मोठे आव्हान चालक, वाहकांच्या समोर आहे. राज्य परिवहन महामंडळात चालकांना आजारी बस चालविताना रस्यावर अनेक समस्यांचा सामोरे जावे लागत आहे. अशातच आता एसटीने शिवशाही ही नवी अद्ययावत बस प्रवाशांच्या सेवेत सरू करून नवे पाऊल टाकले आहे. आकर्षक रंगसंगती ही शिवशाहीचे वैशिष्टे आहेत. प्रवाशांना आपलेसे करणारी ‘शिवशाही’ ही भविष्यात राज्य परिवहन महामंडळाच्या उत्पन्नाचे साधन ठरणारे आहे. त्यामुळे परिवहन विभागाने टप्प्या-टप्पाने ती सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई- पुणे, मुंबई- कोकण, नागपूर- पुणे असा प्रवास ‘शिवशाही’ करणार आहे. वातानुकूलित असलेली ‘शिवशाही’चे खासगी ट्रॅव्हर्ल्सच्या तुलनेत प्रवास भाडे स्वस्त ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अमरावती- पुणे, चंद्रपूर- नागपूर, अमरावती- मुंबई, अमरावती- नागपूर दरम्यानही ती धावणार आहे.
एसटीची ‘शिवशाही’ प्रवाशांच्या सेवेत
By admin | Published: June 12, 2017 12:11 AM