शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
2
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
3
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
4
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
5
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
6
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
7
"मतदानाची वेळ संपल्यावर ७.८३ टक्के मतांची वाढ झाली कशी?", नाना पटोलेंचा निवडणूक आयोगाला सवाल
8
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
9
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
10
बांगलादेशात अटक करण्यात आलेल्या चिन्मय प्रभूंशी इस्कॉनने संबंध तोडले; कोणत्याही कामासाठी जबाबदार नसल्याचे सांगितले
11
१५ हजार एकर जमीन, हजारो कोटी रुपये किंमत, पण वारस नाही, या राजघराण्याची मालमत्ता सरकारने घेतली ताब्यात
12
Ajmer Sharif: "आता चंद्रचूड प्रत्येक ठिकाणी मुलाखती देत बसलेत"; असदुद्दीन ओवेसी भडकले 
13
बांगलादेशातील इस्कॉनला मिळाला मोठा दिलासा! उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नकार
14
'प्यार का पंचनामा' फेम लोकप्रिय अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दीड वर्षांनी आयुष्यात आली छोटी पाहुणी
15
शरद पवार गटाला ७२ लाख मते पण १०च जागा जिंकले, अजितदादा गटाला ५८.१ लाख मते पण ४१ जागा जिंकले
16
प्रकाश आंबेडकरांना सोबत न घेणे भोवले? मविआला २० ठिकाणी फटका; सर्वाधिक नुकसान शरद पवारांचे!
17
Blast in Delhi: राजधानी दिल्लीत मोठा स्फोट; तपास यंत्रणा अलर्ट मोडवर
18
"दिल्ली जगातील सर्वात असुरक्षित राजधानी", अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल 
19
सलग दुसऱ्यांदा शेअर देतेय 'ही' कंपनी, रेकॉर्ड डेट उद्या; ५० रुपयांपेक्षा कमी किंमत
20
खळबळजनक! गुजरातमध्ये सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांची मुद्दाम केली अँजिओप्लास्टी

एसटीची पार्सल सेवा बंद, व्यावसायिकांची धावाधाव, खासगी एजन्सीसोबतचा करार महामंडळाने गुंडाळला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2017 6:17 PM

एसटी महामंडळाने खासगीकरणात दिलेली पार्सल सेवा अचानक बंद केली. एजन्सीने कराराचा भंग केल्याचा दावा करीत एसटी महामंडळाने करार मोडीत काढला आहे. यामुळे पार्सल पाठविणा-यांना खासगी कुरिअरचा शोध घ्यावा लागत आहे. 

अमरावती : एसटी महामंडळाने खासगीकरणात दिलेली पार्सल सेवा अचानक बंद केली. एजन्सीने कराराचा भंग केल्याचा दावा करीत एसटी महामंडळाने करार मोडीत काढला आहे. यामुळे पार्सल पाठविणा-यांना खासगी कुरिअरचा शोध घ्यावा लागत आहे. राज्य परिवहन महामंडळाची पार्सल सेवा स्थापनेपासून कार्यरत आहे. यासाठी पूर्वी एसटीच्या आस्थापनेवर हमाल हा कर्मचारी संवर्ग कार्यरत होता. राज्याच्या कानाकोप-यात भरवशाने पोहोचणारी म्हणून एसटीच्या पार्सल सेवेची ख्याती होती. मात्र, एसटी महामंडळाने पार्सल सेवेचे खासगीकरण करीत २०१२ मध्ये अंकल पार्सल सर्व्हिसेफ या खासगी संस्थेला ही पार्सल सेवा बहाल केली. आता अंकल सर्र्व्हिसेफने कराराचा भंग केल्याचा ठपका ठेवून महामंडळाने या एजन्सीकडून ही सेवा काढून घेतली आहे. सध्या आलेल्या पार्सलचे पूर्णपणे वितरण होईपर्यंत या संस्थेला मोकळे होता येणार नाही. मात्र, नव्याने कुठलेही पार्सल घेण्यास कंपनीला मज्जाव करण्यात आला आहे. अचानक सेवा बंद झाल्याने एसटीने पार्सल पाठविणाºया शेकडो व्यावसायिकांची पंचाईत झाली आहे. या व्यावसायिकांना ऐनवेळी खासगी कुरिअरकडे धाव घ्यावी लागत आहे. दरम्यान, एसटी महामंडळ नवीन एजन्सीकडे हे काम सोपविणार असल्याची चर्चा होत आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती