वरूड : तालुक्यातील बहादा येथील दीप वानखडे याने अभ्यासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना बहादा येथे राहत्या घरी घडली. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
वरूड तालुक्यातील बहादा येथील राहिवासी दीप रमेश वानखडे १७ हा वरूड येथील महात्मा फुले महाविद्यालयात १२ वी विज्ञान शाखेत शिकत होता. १२ वीची परीक्षा अवघ्या काही दिवसांवर असताना अभ्यास पूर्ण न झाल्याने परीक्षेचा ताण आल्याने मी आत्महत्या करीत आहो, माझा कोणावरही आरोप नाही. सॉरी, अशी चिठ्ठी दीपने आत्महत्या केलेल्या खोलीत आढळून आली.
दीप ज्या खोलीत अभ्यास करीत होता त्याच खोलीत पंख्याला दोरी बांधून गळफास घेतला. काही वेळानंतर ही बाब परिवाराच्या लक्षात आल्यावर ही माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळ गाठले. घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता पाठविण्यात आला. यासंदर्भात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास वरूड पोलीस करीत आहे.