अमरावती : रोजगारभिमुख उपक्रम राबवून अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आले. प्रत्येक विद्यार्थी रोजगारदाता बनला पाहिजे, त्या माध्यमातून एका विद्यार्थ्याने ५० जणांसाठी रोजगार उपलब्ध करणाऱ्या निर्धार करावा, असे प्रतिपादन राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी टेक्लॉन्स-२०१५ च्या उद्घाटनासप्रसंगी केले.स्थानिक पी.आर.पाटील ग्रुप आॅफ एज्युकेशन इंन्स्टिट्युटमध्ये टेक्लॉन्स-२०१५ चे थाटात उद्घाटन झाले. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीत व तुकडोजी महाराजांच्या प्राथनेने करण्यात आली. आयपीएस अधिकारी विक्रम सिंह यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन पार पडले. यावेळी एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिला अंपग गिर्रारोहक अरुणीमा सिन्हा, राज्यमंत्री तसेच पालकमंत्री प्रवीण पोटे , इन्स्टिट्युटचे उपाध्यक्ष डी.ए. निभोंरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, संचालक डी.जी. वाकडे, प्रविण मोहोड, प्राचार्य एस.डी. वाकडे, रामचंद्र पोटे, मोहम्मद जुहेर, ए.डब्ल्यू. माहोरे, डी.ए. शहाकार, एस.डी. भुयार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात बोलताना राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी इन्स्टिट्युटच्या इतिहासावर प्रकाश टाकला. इच्छाशक्ती दांडगी असल्यास यश संपादन करता येते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मविश्वासाने केलेल्या कामामुळे देशात १०० टक्के पारदर्शकता आली आहे. त्यामुळे तरुणांसाठी ते आयकॉन ठरले आहे, असे पोटे यांनी सांगितले. विक्रम सिंग यांनी सर्वप्रथम विद्यार्थ्यांना युवा दिनाच्या शुभेच्छा देत स्वामी विवेकानंदाचे विचार मांडले. अंबानगरीची भुमी वीरांची भुमी आहे. या पवित्र भुमीवर तुम्ही ज्ञान संवर्धन करीत आहेत. तुमची सुंदरता तुमचे ज्ञान आहे. मात्र बाहेरील जगात भरकटून जावू नका. असा सल्ला सिंग यांनी विद्यार्थ्यांना दिला. प्रत्येकाचा आत्म्यात दिव्यता आहे. ती प्रकट करण्यासाठी ध्यान व प्रार्थना करणे हाच जीवनाचा उद्देश आहे. निसर्गातील अदृष्य शक्ती माणसांच्या सोबत असते, तीच शक्ती माणसाला जीवनात समोर जायला सहायता करते, असेही सिंग म्हणाले. कार्यक्रमात पालकमंत्री प्रविण पोटे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता महिला मेळावा व साहित्य पुरस्कार वितरणाने झाली. कार्यक्रमाचे संचालन आभा राठोड तर आभार विजय गढीकर यांनी केले. (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांनो रोजगारदाते व्हा!
By admin | Published: January 12, 2015 10:42 PM