शहरं
Join us  
Trending Stories
1
Navya Haridas: प्रियंका गांधींविरोधात भाजपाचा उमेदवार ठरला! नव्या हरिदास कोण?
2
राजेंद्र शिंगणेंच्या हाती तुतारी; पुतणीने शरद पवारांना विचारला खरमरीत सवाल!
3
अखेर रणजीतसिंह मोहिते पाटलांचं ठरलं! आमदारकीचा राजीनामा; लवकरच पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
4
ठाकरेंना कोणत्या जागा हव्यात, ज्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गाडा फसलाय?
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोहोळ, पंढरपूर अन् माढ्याचं गणित चुकल्यास पवारांचं राजकारण बिघडणार
6
Jharkhand Election 2024: भाजपाची पहिली यादी आली! झारखंडमधील ६६ उमेदवारांच्या नावाची घोषणा
7
वडील बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकींची संतप्त पोस्ट; शायरीतून रोख कुणाकडे?
8
भाजप नेतृत्वाच्या मनात नेमकं काय?; फडणवीस-अजितदादा बाहेर, अमित शाह-CM शिंदेंची बंद दाराआड चर्चा!
9
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला की नाही? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
10
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी
11
JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...
12
'वादळवाट', 'आभाळमाया' मालिकांचे गीतकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "...तर महाराष्ट्रात पडसाद उमटतील", बाबासाहेब देशमुखांनी ठाकरेंची चिंता वाढवली!
14
महागड्या प्लॅनचे टेन्शन संपले, Jio चा 84 दिवसांचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन
15
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'सांगोला'मध्ये ठाकरेंविरोधात पुन्हा 'सांगली पॅटर्न'?
16
Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडक्या बहिणी दिवाळी बोनसपासून मुकणार? निवडणूक आयोगाने योजना रोखली
17
IND vs NZ : भारताने ५४ धावांत ७ गडी गमावले; सुवर्णसंधी हुकली, विजयासाठी न्यूझीलंडसमोर खूप सोपे आव्हान
18
महाविकास आघाडीला झटका! अखिलेश यादवांनी चार उमेदवार केले जाहीर
19
झारखंडमध्ये निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; पोलीस महासंचालकांना हटविले
20
माढ्यात तुतारीबाबतचा संभ्रम कायम; चार इच्छुक शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्यानंतर काय घडलं? 

निवडणूक काळात घेण्यात येणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 6:33 PM

Amravati : विधी अभ्यासक्रमात बदल झाल्याने विद्यार्थ्यांना हवा अभ्यासाला वेळ

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती वि‌द्यापीठ अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या नियमित विषम सत्राच्या हिवाळी २०२४ परीक्षा ह्या ११ नोव्हेंबर २०२४ ते २१ नोव्हेंबर २०२४ ह्या दरम्यान होणार आहेत आणि याच दरम्यान महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ पार पडणार आहेत, त्यामुळे त्या १० दिवसात निवडणुकांचा प्रचारांचा धुमाकूळ असणार आहे, प्रचार रॅली, प्रचार सभा भोंग्यांचा आवाज या सर्व घटना होणार आहेत आणि विद्यार्थी सुद्धा सर्व समजाचा, सिस्टिमचा, महाराष्ट्र राज्याचा भाग असल्याने निवडणुकीच्या महोत्सवात सहभागी होतील त्यामुळे साहजिकच या सर्व गोष्टींचा परिणाम हा वि‌द्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणार आहे, या सर्व गोंधळात विद्यार्थी अभ्यास, उजळणी करू शकणार नाही परिणामी त्याचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वि‌द्यार्थ्याचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन आपण विद्यापीठ अंतर्गत घेण्यात येणाऱ्या नियमित विषम सत्राच्या हिवाळी २०२४ परीक्षा ह्या ११ नोव्हेंबर २०२४ ते २१ नोव्हेंबर २०२४ ऐवजी डिसेंबर २०२४ च्या शेवटच्या आठवड्यात घेण्यात याव्या अशी मागणी केली. 

विधी अभ्यासक्रमात बदल झाल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासाला वेळ हवा एलएलबी ३ इयर डिग्री कोर्स च्या दुसऱ्या सत्राचा निकाल २२/०८/२०२४ उशिरा लागल्याने, वि‌द्यार्थ्यांचे प्रवेश उशिरा झाले आणि त्यात अभ्यासक्रमात बदल झाल्याचे परिपत्रक जाहीर केले तोपर्यंत वि‌द्यार्थ्यांनी कोणता अभ्यास करायचा जुना की नवीन हे अधिकृत रित्या विद्यापीठाने जाहीर केलेले नव्हते, त्यामुळे त्या परिपत्रकापसून फक्त ४४ दिवसाचा कालावधी मिळतो त्यात ११ दिवस शासकीय सुट्या आहेत त्यामुळे फक्त ३३ दिवसाचा अतिशय कमी वेळ विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी मिळत आहे, वि‌द्यार्थ्याचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन आपण विद्यापीठ अंतर्गत घेण्यात येणाऱ्या नियमित विषम सत्राच्या हिवाळी २०२४ परीक्षा ह्या ११ नोव्हेंबर २०२४ ते २१ नोव्हेंबर २०२४ ऐवजी डिसेंबर २०२४ च्या शेवटच्या आठवड्यात घेण्यात याव्या अशी नितिन साहेबराव जामनिक विद्यार्थी प्रतीनिधीने निवेदना‌द्वारे मागणी केली. 

टॅग्स :Amravatiअमरावतीuniversityविद्यापीठEducationशिक्षणElectionनिवडणूक 2024