आॅनलाईन लोकमतवरुड : विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लागावी तसेच ज्ञानात भर पडावी म्हणून वाचन चळवळ जिवंत ठेवायची असेल तर ग्रंथ महोत्सव, प्रदर्शनी भरविणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती जयंत देशमुख यांनी केले. वरूड येथे जिल्हा ग्रंथ महोत्सवाच्या उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियान, जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग व मुख्याध्यापक संघांच्या संयुक्त विद्यमाने वरूडात तीन दिवसीय जिल्हा ग्रंथ महोसत्वाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ विचारवंत चंद्रकांत वानखडे यांनी केले. यावेळी आ. अनिल बोंडे, श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, पं.स. सभापती विक्रम ठाकरे, शिक्षक संघर्ष समितीच्या अध्यक्ष संगीता शिंदे, शिक्षण समिती सदस्य अल्का देशमुख, जि.प.सदस्य राजेंद्र बहुरुपी, राजेंद्र पाटील, अनिल डबरासे, दिलीप कडू, शिक्षणाधिकारी नीलिमा टाके, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र कोकाटे, उपशिक्षणाधिकारी बोलके, इ.झेड. खान, गट शिक्षणाधिकारी आरती देशपांडे आदी उपस्थित होते. प्र्रास्ताविक नीलिमा टाके, संचालन नितीन ठाकरे व आभार मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष अशोक चोपडे यांनी मानले.
विद्यार्थ्यांनो, वाचन चळवळीला जिवंत ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 12:11 AM
विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लागावी तसेच ज्ञानात भर पडावी म्हणून वाचन चळवळ जिवंत ठेवायची असेल तर ग्रंथ महोत्सव, प्रदर्शनी भरविणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती जयंत देशमुख यांनी केले.
ठळक मुद्देजयंत देशमुख : जिल्हा ग्रंथ महोत्सवाचे थाटात उद्घाटन