लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विद्यार्थी जीवनात अध्यापन करताना समर्पण करणे तर गरजेचे आहेच; त्याचबरोबर मुलाच्या सुखात स्वत:चे सूख मानणाऱ्या आपल्या माता-पित्याचाही मान राखा, असे उद्बोधन खासदार नवनीत राणा यांनी केले. त्या स्थानिक संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात युवा स्वाभिमान पार्टीतर्फे रविवारी आयोजित इयत्ता दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थी सत्कारप्रसंगी बोलत होत्या.जिल्ह्यातील इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत ३२७२ विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा युवा स्वाभिमान पार्टीचे आमदार रवि राणा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. आभाळ ढगांनी झाकलेला असताना पावसाची तमा न बाळगता जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह पालकांनी भरगच्च उपस्थिती दर्शविली. विशेष म्हणजे हजारोंच्या गर्दीने फुललेल्या कार्यक्रमाला कुणीही नेता, मान्यवरांना निमंत्रित न करता मंचावर खासदार नवनीत राणा, आमदार रवि राणा सर्व सत्कारमूर्ती विद्यार्थ्यांनाच स्थानबद्ध करण्यात आले.उद्याचा देशाचा भविष्य घडविणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या ही मोठी प्रेरणा ठरावी, असे नियोजन या कार्यक्रमाचे होते. सर्व पदाधिकारी पालकांसह विद्यार्थ्यांच्या सेवेत राहिलेत. खा. नवनीत राणा या दाम्पत्यानी सर्वप्रथम दर्यापूर येथील प्रबोधन विद्यालयाचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी मयूर कदम याने दिव्यांगांतून राज्यातून प्रथम मिळविल्याबद्दल मंचावर सन्मानित केले. त्यानंतर प्रत्येकी दहा विद्यार्थ्यांचा गट पाडून २४७० विद्यार्थ्यांना मंचावर आमंत्रित करून प्रमाणपत्र, पुष्पगुच्छाने सन्मानित करण्यात आले व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देत शैक्षणिक प्रेरणा देण्यात आली.गुणवंतांना संसद भवन दाखविणारजिल्ह्यातील इयत्ता बारावीत पुढील वर्षी सर्वाधिक गुण मिळविणाºया गुणवंत विद्यार्थ्यांना संसद भवन, राष्ट्रपती भवन, लोकसभागृह पाहण्याची संधी उपलब्ध करून देणार व त्यासाठीचा प्रवासखर्चसुद्धा करण्याची ग्वाही खासदार नवनीत राणा यांनी यावेळी दिली. यावर उपस्थितांनी जोरदार टाळ्यांचा वर्षाव केला.विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीसाठी सज्जमला जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना वर्ग १, वर्ग २ अधिकारी, खासदार, आमदार बघायचे आहे. त्यासाठी जिल्ह्यातील होतकरू विद्यार्थ्यांसह अन्य विद्यार्थ्यांना शैक्षणिक अडचणी असल्यास आम्हाला कळवाव्यात, त्यावर पर्यायी उपाययोजनेसाठी आम्ही सज्ज असल्याचेही राणा दाम्पत्यांनी यावेळी सांगितले.
विद्यार्थ्यांनी समर्पणासोबत आई-वडिलांचा मान राखावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2019 1:37 AM
विद्यार्थी जीवनात अध्यापन करताना समर्पण करणे तर गरजेचे आहेच; त्याचबरोबर मुलाच्या सुखात स्वत:चे सूख मानणाऱ्या आपल्या माता-पित्याचाही मान राखा, असे उद्बोधन खासदार नवनीत राणा यांनी केले.
ठळक मुद्देनवनीत राणा : युवा स्वाभिमानद्वारा ३२७२ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव