शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या निर्णयानुसार सन २०१४-१५ पासून राज्यात सुमारे ५०० शासकीय शाळांमध्ये व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रम प्रकल्प मान्यता मंडळाच्या मान्यतेने सुरु करण्यात आले. या योजनेतील मेडिया अँड एंटरटेनमेंट (अँनिमेशन ) हा व्यवसायिक विषय इतर सामान्य विषयासह इयत्ता नववी ते बारावीपर्यंत शाळेत मुख्य विषय म्हणून शिकविला जातो. या विषयांतर्गत दिले जाणाऱ्या व्यवसाय प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वयंरोजगार क्षमतेत वाढ होऊन त्यांना स्वावलंबी जीवन जगण्यास मार्गदर्शक ठरत आहे. सदरील विषय विद्यार्थ्यांना खाजगी क्षेत्रामध्ये शिकण्यासाठी औरंगाबाद, पुणे, मुंबई, बँगळूरू ,हैदराबाद येथे शिक्षण घेण्यासाठी जावे लागते. त्यात खूप मोठे शुल्क द्यावे लागते. त्यामुळे वंचित विध्यार्थी अवाजवी शुल्क भरू शकत नाही. तसेच कार्टून कसे तयार करतात, ते कसे चालतात, कसे बोलतात, कार्टूनला कसे अँनिमेट करतात याचे ज्ञान होते. परंतु महाराष्ट्र शासनाने सन २०२० ते २०२१ पासून हा विषय बंद केला आहे. व्यवसाय शिक्षणाची सोय उपलब्ध असून आजच्या स्पर्धेच्या युगात मिडिया अँड इंटरटेनमेंट यासारख्या ज्ञानाची नितांत गरज आहे. यासाठी मेडिया अँड एंटरटेनमेंट (अँनिमेशन ) हा विषय पुन्हा नव्याने सुरू व्हावा, ही मागणी अमोल धर्माळे यासह अन्य विद्यार्थ्यांकडून होत आहे
ॲनिमेशन विषयाच्या शिक्षणापासून विद्यार्थ्यांना मुकावे लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 4:16 AM