दहा शाळा संगणकीकृत : शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या निधीतून डिजिटायझेशन लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : कोणताही शासकीय निधी न घेता शिक्षक, शिक्षण खाते व कर्मचाऱ्यानी दिलेल्या दानाच्या पैशातून अंजनगाव नगर परिषदेच्या दहा शाळा डिजीटल केल्या आहेत. ही संपूर्ण अमरावती जिल्ह्यासाठी गौरवाची बाब असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले. ते नगर परिषदेच्या वतीने शाळा डिजीटेलायजेशन कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष कृष्णकांत लांडोळे होते. यावेळी आमदार रमेश बुंदीले, शिक्षण सभापती पल्लवी गवर्ऐ, मुख्याधिकारी गीता वंजारी, शिक्षण प्रशासन अधिकारी संजय तळोकर, उपविभागीय अधिकारी खंडागळे, तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी, शहर भाजपाचे अध्यक्ष मनोहर मुरकुटे प्रामुख्याने उपस्थित होते. शिक्षण सभापती पल्लवी गवई यांनी पालकमंत्र्यांनी शाळा दत्तक घेऊन विकास करण्याची मागणी के ली. ५६ कोटींची विकासकामे : अंजनगाव सुर्जी नगर परिषदेने विकास कामासाठी पुढाकार घेतला असल्याने त्यांना निधीची उणीव जाणवू देणार नाही असे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी सांगितले. शहर भेटीदरम्यान त्यांनी दर्यापूर-अंजनगाव-अकोट मार्गाच्या विकासकामाचे भूमिपूजन केले. १० वर्षांपूर्वी अंजनगाव नगर परिषदेने सुरू केलेल्या हरितपट्ट्याचे कौतुक केले. नगर पालिकेने केलेल्या अडीच हजार वृक्षारोपण कार्यक्रमाचेही कौतुक केले.
विद्यार्थी घेतील डिजिटल ज्ञान
By admin | Published: July 12, 2017 12:14 AM