लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषद पदाधिकारी निवड प्रक्रियेनंतर आता विषय समितीतीतल रिक्त जागांवर निवड करण्यासाठी २ मार्च रोजी विशेष सभा बोलवण्यात आली आहे. यामध्ये विविध समित्यांवरील २२ रिक्त जागांपैकी २० जागा विशेष सभेत भरल्या जाणार आहेत. सदर जागा बिनविरोध की निवडणुकीव्दारे, हे अद्याप अस्पष्ट आहे. दुसरीकडे स्थायी, बांधकाम, जलव्यवस्थापन समितीत वर्णी लावण्यासाठी इच्छुक सदस्य व पंचायत समितीच्या सभापतींनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.जिल्हा परिषदेच्या सभागृहाची सदस्यसंख्या ही ५९ आहे. पंचायत समिती सभापती १४, एकूण जिल्हा परिषद सभासद संख्या ७३, पदाधिकारी संख्या ६, झेडपी सदस्यांची २ पदे रिक्त आहेत. समितीवर प्रतिनिधीत्व द्यावयाची सदस्य संख्या ६७, एकूण समित्या १०, दहा समित्यांवरील सदस्य संख्या ८३, समित्यांवरील भरलेल्या जागा ६१, समित्यावर रिक्त असलेल्या सदस्यांची संख्या २२, सद्यस्थितीत प्रत्येकी एका समितीवर सदस्य असणाऱ्या सदस्यांची संख्या ३३ आहे. दोन समितीवर असलेल्या सदस्यांची संख्या १३, सद्यस्थितीत एकाही समितीवर सदस्य नसलेल्या सदस्यांची संख्या १७ आहे. यामध्ये जिल्हा परिषदेचे पाच सदस्य व १३ पंचायत समिती सभापतींचा समावेश आहे. समितीवरील रिक्त २२ जागांपैकी २०, तर २ जागा रिक्त ठेवल्या जाणार आहेत. ७ समित्यांवर २० सदस्य सर्वसाधारण प्रवर्गातून, तर दोन सदस्य अनुसूचित जाती व नामाप्र सदस्यांमधून भरावयाचे आहे.रिक्त समिती सदस्य संख्यास्थायी समिती ३, जलव्यवस्थापन १, कृषी समिती ३, बांधकाम समिती २, वित्त समिती ५, पशुसंवर्धन समिती ३, महिला व बालकल्याण समिती १ अशा एकूण २२ जागा विषय समितीवर रिक्त आहेत.पैकी २० जागा भरल्या जातील.असा निवडणूक कार्यक्रमसमितीसाठी नामनिर्देशन अर्ज भरणे सकाळी १० ते १२ पर्यत त्यानंतर दुपारी १ वाजता सभेचे कामकाज यामध्ये विषय समितीवरील सदस्य निवडून देण्यासाठी एकल संक्रमणीय पद्धतीनुसार मतदान घेऊन समप्रमाणात सदस्य निवडले जातील. दाखल केलेल्या उमेदवारांची नावे वाचून दाखविणे, नामनिर्देशन पत्राची छाननी करणे, वैध नामनिर्देशन पत्राची नावे वाचून दाखविणे, नामनिर्देशन पत्र मागे घेणे आणि आवश्यकता भासल्यास मतदान घेऊन मतमोजणी करणे आदी प्रक्रिया केली जाणार आहे.
विषय समिती सदस्यत्वासाठी ‘लॉबिंग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 6:00 AM
जिल्हा परिषद पदाधिकारी निवड प्रक्रियेनंतर आता विषय समितीतीतल रिक्त जागांवर निवड करण्यासाठी २ मार्च रोजी विशेष सभा बोलवण्यात आली आहे. यामध्ये विविध समित्यांवरील २२ रिक्त जागांपैकी २० जागा विशेष सभेत भरल्या जाणार आहेत. सदर जागा बिनविरोध की निवडणुकीव्दारे, हे अद्याप अस्पष्ट आहे.
ठळक मुद्देजिल्हा परिषद : २ मार्चला सभा, २० जागांसाठी निवडणूक