ठळक मुद्देआ. राणा : अधिकाऱ्यांसमवेत केली पाहणी
आॅनलाईन लोकमतअमरावती : यंदाच्या हंगामात बीटी कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यानेच शेतकरी अडचणीत आला. यासाठी दोषी बियाणे कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे व शेतकऱ्यांना एकरी ५० हजारांची भरपाई मिळावी, अशी मागणी आ. रवि राणा यांनी केली.आ. राणा यांनी गुरूवारी उपविभागीय कृषी अधिकारी विनोद शिरभाते, तहसीलदार अजित चेडे व कृषी अधिकाºयांसह भातकुली तालुक्यातील बाधित क्षेत्राची पाहणी केली. त्यांच्यासोबत राजू रोडगे, आशिष कावरे, गिरीश कासट, अमोल पवार, गणेश पाचकवडे, दीपक ठाकरे, अब्दुल शफीक, दिनेश पवार, हरिदास मिसाळ, दिलीप पाटील, गजानन चुनकीकर, अमर तरडेजा आदी शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.