शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

गौण तस्करांची मुजोरी, तहसीलदारांना न जुमानता वाळू ट्रक पळवण्याचा घाट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2024 10:15 PM

मनीष तसरे अमरावती : अवैध गौण खनिज पळवून नेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यांच्यावर आता कार्यवाहीचा फास आवळण्यासाठी अमरावती तहसील ...

मनीष तसरेअमरावती : अवैध गौण खनिज पळवून नेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यांच्यावर आता कार्यवाहीचा फास आवळण्यासाठी अमरावती तहसील कार्यालयाने तीन पथके निर्माण केली आहेत. सकाळी १०च्या सुमारास तहसीलदार विजय लोखंडे यांनी शहरातून एक वाळू वाहून नेणाऱ्या ट्रकला थांबविण्याचा प्रयत्न केला असता ट्रकचालक न जुमानता वाहन पळविण्याचा प्रयत्न केला. पुढे श्याम चौकात त्याला पकडले. त्या वाहनाचा पंचनामा करून दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. कुठलीही रॉयल्टी नसताना वाळूची वाहतूक करण्याच्या कारणावरून चालक पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना ही कार्यवाही करण्यात आली.

बांधकामासाठी वापरण्यात येणारी वाळू, मुरूम, गिट्टी यांचे अवैध उत्खनन, वाहतूक रोखण्यासाठी, अवैध मार्गाने विनारॉयल्टी विक्री व साठवणूक आणि खरेदी करणाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे वाळू व गौण खनिजांची नियमानुसार जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या वाहतूक पावती द्वारे खरेदी करणे आवश्यक आहे.

त्यानुसार मंगळवारी सकाळपासून विद्यापीठ मार्गावर तहसील कार्यालयामार्फत गठित पथकाने अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात आली. यावेळी त्यांनी वाहतूक पास, रॉयल्टी तसेच परवान्याची तपासणी केली. यावेळी दोन वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये मंडळ अधिकारी डी.जी.गावनेर, वाय.एम.चतूर, एस.आर.जोगी, सरिता मोजरे, एम.डी.सांगळे, सोनल फुंदे, गिरमुंजे, अभिजित देशमुख, गजानन देशमुख, अजय पाटेकर, मनोज धर्माळे हे सहभागी होते.

 

टॅग्स :AmravatiअमरावतीCrime Newsगुन्हेगारी