प्रदीपभाऊ निमकाळे यांची जनसेवा ही सर्वश्रूत होती. कोणत्याही आणि कशाच्याही रुग्णाची ते यशस्वीपणे सेवा करीत असत. पण, त्यांच्या अचानक जाण्याने निराधार झालेल्या त्यांच्या मित्र परिवाराने त्यांच्या रुग्णसेवेत कुठेही खंड पडू नये म्हणून जोमाने कामाला सुरुवात केली आहे. दिनांक २२ जुलैला तालुक्यातील सातेगाव, गावंडगाव, तुरखेड, चौसाळा, निमखेड, जवर्डी, भंडारजमधील ४० गरीब रुग्णांच्या डोळ्यांवर आचार्य विनोबा भावे रुग्णालय, सावंगी मेघे येथे यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यासाठी सावंगी मेघे येथून रुग्णालयाची बस रुग्णांना नेण्यासाठी अंजनगांव सुर्जी येथे आली होती हे विशेष. यासाठी सनी शेळके यांच्या मार्गदर्शनात रुग्णसेवक निवृत्ती गळस्कर, राजू पडोळे, बाळाभाऊ निमकाळे, निखिल कडू, अनिलभाऊ आलोकर, राजू ढोक, सुजित काठोळे, रंजित इंगळे, गोपाळ कोल्हे, राजूभाऊ चिंचोळकर, श्रीकांत वाघ, बाबू मानकर, शिवा घटारे, अक्षय चिकटे, छोटू अढाऊ, मयुर कावरे, शुभम निमकाळे, अवी टाक, मंगेश मिसळे, मुन्ना घोरड, श्रीकांत रुचके, नानाभाऊ महारणर, अनंता मते, आशिष मानकर, राम नळकांडे, जीवन कात्रे, जयसिंग सोळंके, अवी ढोरे, गौरव अलोकार, रहीम शाह, यश सोनोने, मयुर कावरे, छोटू लढाऊ, अनुप लढाऊ,
अभिजीत पाखरे