शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
2
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
3
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
4
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
5
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
6
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
7
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
9
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
10
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
11
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
12
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
13
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
15
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
16
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
17
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
19
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
20
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी

मंदिरांच्या जीर्णोद्धारांसाठी बच्चू कडू यांचा यशस्वी पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2024 11:21 AM

Amravati : कोट्यवधी रुपयांच्या निधीने मंदिरांना झळाळी, दिव्यांग, गोरगरीब, शेतकरी, निराधारांसाठी लढा

लोकमत न्यूज नेटवर्क अचलपूर : कडू हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अजब रसायन आहे. सत्य बोलायला न घाबरणाऱ्या बच्चू कडू यांनी धर्मातील चुकीच्या गोष्टीचे कदापि समर्थन केले नाही. मात्र धर्मासाठी आणि धर्माच्या विस्तारासाठी त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून आपले कार्य सदैव सुरू ठेवले. 

विरोधकांनी नेहमी त्यांना धर्माच्या मुद्द्यांवरून घेरण्याच्या प्रयत्न केला. पण बच्चू कडू यांनी अचलपूर मतदारसंघातील मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी शासनाच्या तिजोरीतून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून या दिवाळीला मतदारसंघातील मंदिरांना झळाळी मिळाली, हे विशेष. देव, देश आणि धर्म यासाठी विरोधक केवळ गोष्टी करतात. मात्र देशाचा नागरिक म्हणून धर्माचा रक्षक समजून बच्चू कडू यांनी देवांची मंदिरे उजळवून टाकली. 

त्यांच्या कामाची पद्धत ही वेगळी असून त्यांचा लढा खऱ्या अर्थाने दिव्यांग, गोरगरीब, निराधार, शेतकरी बांधव यांच्यासाठी असून त्यांच्या आशीर्वादाने आपण निवडून आलो, असे ते जाहीरपणे सांगतात. अचलपूर मतदारसंघातील मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी शासनाकडून वेगवेगळ्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून मंदिरांचा कायापालट करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले 

जयस्तंभ चौकातील शिवतीर्थचा होणार कायापालट परतवाडा येथील जयस्तंभ चौक येथे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. परतवाडा येथील शिवप्रेमींचे ते शिवतीर्थ आहे. शिवतीर्थच्या विकासाकरिता आमदार बच्चू कडू यांनी आपल्या निधीतून तब्बल ६० लक्ष रुपये मंजूर करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या परिसरातील सौंदर्यार्थीकरण करण्यात येणार आहे. यामुळे परतवाड्याच्या लौकिकात भर पडणार एवढे मात्र नक्की.

अचलपुरातील २२ प्राचीन मंदिरांचे रूपडे पालटले अचलपूर विधानसभेत अनेक प्राचीन मंदिरे आहेत. त्या प्रत्येक मंदिराला इतिहास आहे. जवळपास १०० कोटी रुपये निधी उपलब्ध करून जीर्णोद्धार करण्याचे काम बच्चू कडू यांनी केले आहे. मोठ्या प्रमाणात मंदिरांसाठी निधी उपलब्ध करून अचलपुरातील सर्व भाविक भक्तांची मने त्यांनी जिंकली आहेत. अष्टमासिद्धी येथील प्रसिद्ध कापूर विहिरीच्या विकासाला तब्बल पाच कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. अचलपूर येथील बारी समाज हनुमान व्यायाम आखाडा या कामाकरता २ कोटी २२ लक्ष रुपये मंजूर करून दिले आहेत. त्यासोबतच जवळपास अचलपुरातील २२ प्राचीन मंदिरांकरिता कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊन तेथील खऱ्या अर्थाने विकास केला आहे.

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडूmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४achalpur-acअचलपूरAmravatiअमरावती