शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
4
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
5
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
6
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
7
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
8
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
10
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
11
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
12
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
13
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
14
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
15
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
16
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
17
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
18
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
19
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
20
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण

शेतमजूर पुत्राचा यशस्वी प्रवास!

By admin | Published: April 09, 2016 12:01 AM

जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम करण्याची क्षमता असेल तर काहीही अशक्य नाही. येथील एका शेजमजुराच्या मुलाने चक्क शिपाईपदापासून वित्त व लेखाधिकारी पदापर्यंतचा...

जिद्दीला सलाम : शिपाई ते वित्त व लेखाधिकारी दर्यापूर : जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम करण्याची क्षमता असेल तर काहीही अशक्य नाही. येथील एका शेजमजुराच्या मुलाने चक्क शिपाईपदापासून वित्त व लेखाधिकारी पदापर्यंतचा नेत्रदीपक प्रवास करून इतरांपुढे आदर्श घालून दिला आहे. चंद्रकांत साहेबराव खारोडे असे या शेतकरीपुत्राचे नाव आहे. त्याने अलीकडेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली. त्याची वित्त व लेखाधिकारी वर्ग -१ पदी निवड झाली. गजानन कोरे यांच्याकडून स्पर्धा परीक्षेचे धडे घेऊन त्याने तीन वर्र्षांत यश संपादन केले. तीन वर्षांपूर्वी चंद्रकांत हा कृषी अधिकारी कार्यालयात शिपाई पदावर कार्यरत होता. येथील भवानीवेश परिसरात चंद्रमौळी झोपडी आहे. शिपाईपदावर कार्यरत असताना अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. त्यादिशेने त्याचे प्रयत्न सुरू होते. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून त्याने विक्रीकर निरीक्षकाची परीक्षा दिली. ही परीक्षा त्याने उत्तीर्ण केली. त्यातून त्याची नागपूर येथे विक्रीकर निरीक्षकपदी निवड झाली. हे करीत असताना पुन्हा त्याने ‘एमपीएससी’ची परीक्षा देऊन नेत्रदीपक यश संपादन केले आहे. आयएएस अधिकारी होण्याचे त्याचे स्वप्न असल्याचे त्याने सांगितले. दर्यापूर तालुक्यातील शुभम ठाकरे व सतीश गावंडे यांची वर्ग -२ च्या अधिकारीपदी निवड झाली आहे.