सुमित हरकुट।लोकमत न्यूज नेटवर्कचांदूरबाजार : तालुक्याच्या नदी-नाल्यांना २९ आॅगस्ट रोजी सकाळी अचानक पूर आला. २८ व २९ तारखेला तालुक्याच्या दुर्गम भागात अतिवृष्टी झाल्याची माहिती हाती आली आहे. दुसरीकडे ‘महसूल’च्या नोंदीनुसार तालुक्यात सरासरी २५.१२ मि.मी. एवढाच पाऊस झाला. तर तालुक्यातील एका पर्जन्यमापकात १०३ मिमी पाऊस झाल्याची नोंददेखील घेण्यात आली आहे.पूर आल्यामुळे रात्री कुठे तरी अतिवृष्टी झाली असावी, असा अंदाज अनेक वयोवृद्ध नागरिकांनी व्यक्त केला. तालुक्यातील नदी-नाले पात्र बदलले होते. याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला असता उत्तरेकडील काही गावांत अतिवृष्टी झाल्याचा पुरावा हाती आला. तालुक्याच्या उत्तरेकडे असलेल्या घाटलाडकी, वणी, बेलमंडळी, विश्रोळी, रेडवा, चिंचकुंभ, कुरणखेड, निमखेड, गणोजा, सुरळी, बेलखेड, विश्रोळी इत्यादी गावांच्या परिसरात या २४ तासांत अतिवृष्टी झाल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.या परिसरातील शेतांना, रस्त्यांना व काही ठिकाणी पिकांनासुद्धा अतिवृष्टीचा फटका बसला आहे. साधारणत: ६५ ते ७० मि.मी.च्यावर पाऊस झाल्यासच अतिवृष्टी गृहित धरली जाते. परंतु या दिवसी कोणत्याही मंडळात ४३ मि.मी.वर पाऊस झाला नव्हता. परंतु या अतिवृष्टीची नोंद झाली आहे.२४ तासांत १०३ मिमीतालुक्यातील मध्यम पूर्णा प्रकल्पाच्याजवळ विश्रोळी गावात हे पर्जन्यमापक लावलेले असून यावर पूर्णा प्रकल्पाचा अधिकार आहे. या पर्जन्यमापकातील पावसाच्या नोंदी आहेत. येथील पर्जन्यमापकात २८ व २९ तारखेला २४ तासांत झालेल्या पावसाची नोंद १०३ मि.मी. इतकी झाल्याचे पूर्णा मध्यम प्रकल्पाचे सहायक अभियंता प्रज्वल वंजारी यांनी सांगितले.मंडळ अधिकाºयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुठेही अतिवृष्टी नाही. विश्रोळी भागात झालेल्या पावसाची माहिती तेथील स्थानिक नागरिक आतापर्यंत देत आहे.- शिल्पा बोबडे, तहसीलदार, चांदूरबाजार
अचानक आला पूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 11:31 PM
तालुक्याच्या नदी-नाल्यांना २९ आॅगस्ट रोजी सकाळी अचानक पूर आला. २८ व २९ तारखेला तालुक्याच्या दुर्गम भागात अतिवृष्टी झाल्याची माहिती हाती आली आहे.
ठळक मुद्देचांदूरबाजार तालुका : महसूलकडे नोंद नाही