आॅनलाईन लोकमतअमरावती : महापालिकेचे पशू शल्यचिकित्सक सुधीर साहेबराव गावंडे (४२) यांनी सोमवारी सायंकाळच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी ६ च्या सुमारास गाणू वाडी स्थित त्यांच्या घराच्या पहिल्या मजल्यावर ते गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले.सुमारे दोन महिन्यांपूर्वी सुधीर गावंडे रजेवर गेल्याने त्यांचा प्रभार सहायक पशू शल्यचिकित्सक सचिन बोंद्रे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. तेव्हापासून ते आत्यंतिक तणावात होते. महापालिका वर्तुळात अभ्यासू म्हणून ख्यातीप्राप्त असलेल्या गावंडे यांनी आत्मघात का केला असावा, याबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे. सन २००८ मध्ये ते मनपात पशू शल्यचिकित्सक म्हणून रुजू झाले होते. रजेनंतर रुजू होण्यास परतलेले गावंडे यांना यवतमाळच्या मेडिकल बोर्डासमोर उपस्थित राहण्यास प्रशासनाने बजावले होते. त्यामुळे ते तणावात असल्याचे अधिकारी-कर्मचाºयांचे म्हणणे आहे. येथील जुन्या बायपास स्थित गाणू वाडीमधील रिद्धी-सिद्धी अपार्टमेंटमध्ये ते पत्नी डॉ. जया आणि चार वर्षांची मुलगा वैदेही (पिहू) हिच्यासोबत राहत होते. राजापेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी ६ च्या सुमारास ते गळफास घेतलेल्या अवस्थेत मृत आढळून आले. त्या ठिकाणी ‘सुसाइड नोट’ आढळून आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. गावंडे यांच्या आत्महत्येची माहिती कळताच अनेक अधिकारी-कर्मचाºयांनी त्यांच्या घरी धाव घेतली. कौटुंबिक ताणतणावातून त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती राजापेठचे ठाणेदार किशोर सूूर्यवंशी यांनी दिली.रजा सक्तीची की ऐच्छिक ?महापालिकेच्या सेवेत गावंडे यांना रुजू करून घेतले होते, असा दावा आयुक्तांनी केला असला तरी त्यांच्या आत्महत्येनंतर वेगळाच घटनाक्रम समोर आला आहे. त्यांना प्रशासनाने सक्तीच्या रजेवर पाठविले. त्यामुळे ते तणावात होते. जर त्यांना रुजू करून घेतले होते, तर पशुशल्य चिकित्सकाचा पदभार बोंद्रेंकडे कसा, असा सवाल त्यांच्या सहकारी अधिकाºयांनी उपस्थित केला आहे.गावंडे यांना मी पुनर्स्थापित केले होते; तथापि तीन-चार महिन्यांपासून ते रजेवर होते. कौटुंबिक तणावातून त्यांनी आत्महत्या केल्याची माझी माहिती आहे.- हेमंत पवार, आयुक्त, महापालिका
महापालिका पशुशल्यचिकित्सक सुधीर गावंडे यांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 12:26 AM
महापालिकेचे पशू शल्यचिकित्सक सुधीर साहेबराव गावंडे (४२) यांनी सोमवारी सायंकाळच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.
ठळक मुद्देतणाव कारणीभूतमहापालिकेत शोककळा