शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची निवडणूक संपत नाही तोच दिल्लीत तयारी सुरु झाली; आपची पहिली यादी आली
2
'या' ५१ जागा ठरवणार खरी शिवसेना कुणाची; एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंपेक्षा वरचढ ठरणार?
3
‘लोकल’ बंद न ठेवता ‘त्यांनी’ केले मतदान;  रेल्वे प्रशासनाची प्रशंसनीय व्यवस्था
4
भारीच! 'या' २५ मतदारसंघांमध्ये झालं ७५ टक्क्यांहून अधिक मतदान; ८४.७९ टक्केवाला 'टॉपर'
5
"सगळं ओक्केमध्ये असेल तर..." कॅप्टन बुमराहचं सहकारी शमीसंदर्भात मोठं वक्तव्य
6
निकालानंतरच्या रणनीतीसाठी मविआ नेत्यांची आज बैठक; अपक्षांसोबत संपर्क साधणार
7
एकनाथ शिंदे ते पृथ्वीराज चव्हाण: प्रमुख नेत्यांच्या मतदारसंघात किती झाले मतदान?
8
अमेरिकेतील लाच प्रकरणी Adani Group कडून पहिली प्रतिक्रिया; अदानींवरील आरोपांवर दिलं 'हे' उत्तर
9
रुग्णाबाबत महिला न्यायाधीशांनी वाचली बातमी अन् थेट पोहोचल्या हॉस्पिटलमध्ये..., आता होतंय खूप कौतुक!
10
"लोकांना सरकारबद्दल आपुलकी आहे म्हणूनच..."; मतदानाची टक्केवारी वाढल्यावर फडणवीसांचे विधान
11
CM तुरुंगात जातात, पण 'त्यांना' काहीच होणार नाही; अदानींवरील आरोपांवरून राहुल गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा
12
एक बातमी अन् गौतम अदानींची ₹10,13,27,30,32,800 एवढी संपत्ती स्वाहा...! अब्जाधिशांच्या टॉप 20 मधूनही बाहेर
13
India Inflation Rate: महागाई, दरकपातीबाबत आरबीआय-केंद्र सरकारमध्ये मतभेद!
14
लोकांनी कपड्यांवरुन ट्रोल केल्यावर स्वरा भास्करचंं सडेतोड उत्तर, म्हणाली- "लग्नानंतर मी..."
15
Kartik Aaryan : अभिनयामुळे सोडून गेली गर्लफ्रेंड; 'अशी' होती अभिनेता कार्तिक आर्यनची लव्ह लाईफ
16
"आमच्याशिवाय सत्ता स्थापन होणार नाही", विधानसभा निकालापूर्वी बच्चू कडूंचा मोठा दावा
17
चार वेळा उपमुख्यमंत्रिपद दिले अन् अन्याय झाला म्हणता?; शरद पवार यांचा अजित पवार यांना उपरोधिक सवाल
18
निकालाआधीच मविआत मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच; संजय राऊतांचा नाना पटोलेंना टोला
19
"बाबा की जय हो, थोडं ज्ञान जपून ठेवा..."; मोहम्मद शमीची संजय मांजरेकरबद्दल खोचक प्रतिक्रिया
20
Exit Poll च्या आकडेवारीत निराशा आली तरीही 'या' प्रमुख जागांवर मनसेला विजयाची आशा

क्वारंटाईन व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या; अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 8:04 PM

मोर्शी तालुक्यातील अंबाडानजीकच्या पिंपरी येथील एका शेतमजुराने शुक्रवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याला गावातीलच जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते. शनिवारी सकाळी ही घटना उघड झाली. ज्ञानेश्वर काशिनाथ अंगारे (३२, रा. पिंपरी), असे मृताचे नाव आहे.

ठळक मुद्देआत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मोर्शी तालुक्यातील अंबाडानजीकच्या पिंपरी येथील एका शेतमजुराने शुक्रवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याला गावातीलच जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते. शनिवारी सकाळी ही घटना उघड झाली. ज्ञानेश्वर काशिनाथ अंगारे (३२, रा. पिंपरी), असे मृताचे नाव आहे.ज्ञानेश्वर हा काही दिवसांपूर्वी मजुरीसाठी नांदगाव खंडेश्वर येथे गेला होता. लॉकडाऊनमुळे तो नांदगाव खंडेश्वर येथे अडकून पडला. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात विविध ठिकाणी अडकून पडलेले मजूर प्रशासनाच्यावतीने स्वगृही पाठविण्यात आले. त्यात तोही गावी परतला. आरोग्य तपासणी करून ज्ञानेश्वर अंगारे याला गावातीलच जिल्हा परिषदेच्या शाळेत २० मे रोजी विलगीकरणासाठी ठेवण्यात आले होते. दरम्यान शुक्रवारी रात्री १० ते ११ वाजताच्या दरम्यान ज्ञानेश्वर अंगारे यांनी शाळेनजीक असलेल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी रात्री दरम्यान तो स्वत:च्या घरी गेला. रात्रीच घरातून साडी घेऊन तो बाहेर पडल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. शनिवारी पहाटे त्याचा मृतदेह त्याच्याच घरालगतच्या पिंपळाच्या झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. ही बाब शनिवारी सकाळी उघड झाली. मोर्शी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. ज्ञानेश्वरच्या पश्चात पत्नी, सात वर्र्षांची मुलगी व दोन चिमुकली मुले आहेत. त्याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.२० मे रोजी संबंधित इसमाला पिंपरी जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते. आत्महत्येप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे.- संजय सोळंके, ठाणेदार, मोर्शी

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSuicideआत्महत्या