लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य उत्पादन शुल्क विभागातील सेवानिवृत्त प्रल्हाद हरिश्चंद्र कावरे (७०,रा. पोटे टाउनशिप) यांनी बुधवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गाडगेनगर हद्दीतील हॉटेल गौरी इन समोरच्या रस्त्यालगतच्या झाडावर घडली.प्रल्हाद कावरे १० वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले. पोटाचा आजार असल्याने ते उपचार घेत होते. मात्र, काही वर्षांमध्ये त्यांचा त्रास अधिकच वाढला होता. या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे त्यांनी मृत्यूपूर्व लिहिलेल्या चिठ्ठीतून उघड झाले आहे. बुधवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास प्रल्हाद कावरे घराबाहेर पडले. अमरावती-नागपूर मार्गावरील गाडगेनगर हद्दीतील हॉटेल गौरीसमोरील रस्त्यालगत असणाऱ्या एका झाडावर प्रल्हाद यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. ही बाब लक्षात येताच काही नागरिकांनी याची माहिती गाडगेनगर पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यावेळी प्रल्हाद कावरे यांनी मृत्यूपूर्व लिहिलेली चिठ्ठी आढळली. पोटाच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी चिठ्ठीत नमूद केले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व मोठा आप्त परिवार आहे. त्यांचा एक मुलगा डॉक्टर असून, दुसरा मुलगा नागपूर येथे पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहे. या प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास सुरू आहे.
सेवानिवृत्त निरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2018 11:11 PM
राज्य उत्पादन शुल्क विभागातील सेवानिवृत्त प्रल्हाद हरिश्चंद्र कावरे (७०,रा. पोटे टाउनशिप) यांनी बुधवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गाडगेनगर हद्दीतील हॉटेल गौरी इन समोरच्या रस्त्यालगतच्या झाडावर घडली.
ठळक मुद्देगाडगेनगर हद्दीतील घटना : पोटाच्या आजाराला कंटाळून उचलले पाऊल