-----------------
पांढरी शिवारातून दुचाकी लंपास
बडनेरा : नजीकच्या ग्राम पांढरी शिवारात २९ जुलै रोजी दुपारी शेतात कामाला गेलेला मयूर रघुनाथराव राऊत (२७, रा. कवठा बहाळे) याची एमएच २७ एएम ६९३८ क्रमांकाची दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केली. त्याने रस्त्याच्या कडेला ही दुचाकी लावली होती. बडनेरा पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
--------------
रहाटगाव चौकात हॉटेलविरुद्ध कारवाई
अमरावती : नांदगावपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहाटगाव चौकातील हॉटेल लाला चिकनवाला हे प्रतिष्ठान कोरोना नियम डावलून सुरू ठेवण्यात आले होते. त्यामुळे पोलिसांनी सतीश शिवनारायण जयस्वाल ट्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. त्याला समजपत्रावर सोडण्यात आले.
------------------
दारूविक्रेत्यांविरुद्ध कारवाई
अमरावती : बडनेरा व गाडगेनगर पोलिसांनी अनुक्रमे संतोष देविदजास मेहंगे (३३, रा. अंजनगाव बारी) व नवनीत नंदू थोरात (२७, रा. शेगाव) या दोघांरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
------------
एकवीरा शाळेत आभासी व्याघ्र दिन
मोर्शी : एकवीरा स्कूल ऑफ ब्रिलियंट्स येथे आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन आभासी पद्धतीने साजरा करण्यात आला. यामध्ये काही विद्यार्थ्यांनी वेगवेगळी घोषणावाक्ये लिहून त्यांचे व्हिडिओ शाळेला सादर केले तसेच काही विद्यार्थ्यांनी वाघाचे संरक्षण आणि संवर्धन यावर आधारित पोस्टर आणि पैंटिंग्स सादर केल्या. शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, प्राचार्य मंगेश वानखडे, उपप्राचार्य मंगेश वाळके यांनी परिश्रम घेतले.
---------------
जागृत विद्यालयात कारगिल विजय दिन
वरूड : स्थानिक जागृत विद्यालयात कारगिल विजय दिनी माजी सैनिकांना सन्मानित करण्यात आले. सेवानिवृत्त कॅप्टन प्रकाश केंडे, कमांडिंग ऑफिसर कर्नल ए.एस. बैंस, महार रेजिमेंटचे राहुल कवडेती, मराठा रेजिमेंटचे स्वप्निल अलोडे, महार रेजिमेंटचे पवन आहाके, राजेश उईके, प्राचार्य संध्या वांदे, उपमुख्याध्यापिका आरती वानखडे, पर्यवेक्षक चंद्रशेखर अढाऊ उपस्थित होते. एन.सी.सी. अधिकारी सुनील उईके, उपप्राचार्य मंदा चौधरी उपस्थित होते.