अमरावती : देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमाचे अनुषंगाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत पुढील १०० दिवसांत हगणदरीमुक्त शाश्वतता टिकविण्यासाठी जिल्हाभरात स्थायित्व व सुजलाम् अभियान राबविले जाणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिली.
लोकसहभागाच्या माध्यमातून सामुदायिक स्तरावर हगणदरीमुक्त शाश्वततेचे परिणाम अधिक प्रभावीपणे साध्य करण्यासाठी आणि ग्रामीण भागात शोषखड्ड्यांच्या निर्मितीतून सांडपाणी व्यवस्थापन करणे या बाबीचा समावेश आहे. या कालावधीत जिल्ह्यात अभियानादरम्यान ४० हजार शोषखड्डे तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हगणदरीमुक्तीची शाश्वतता टिकविणे आणि सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक इतक्या शोषखड्ड्यांचे बांधकाम पूर्ण करणे, याकरिता ग्रामपंचायतींनी ठराव मंजूर करावा. हगणदरीमुक्तीची (ओडीएफ) शाश्वतता टिकविणे आणि नियोजित शाेषखड्ड्यांचे बांधकाम करणे याकरिता १०० दिवसांचा आराखडा प्रत्येक ग्रामपंचायत तयार करणार आहे. नादुरुस्त शौचालयांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात यावे. नादुरुस्त शौचालय अंतर्गत शौचालय दुरुस्त करण्यासाठी कुटुंबाची निवड करण्यासाठी व्दितीयस्तर हागणदारीमुक्त ग्रामपंचायत पडताळणी पूर्ण करावी.तसेच सर्व नवीन कुटूंबांकडे शौच्छालय असल्याबाबतची खात्री करावी.सदर अभियानाबाबत लोकांना माहिती देण्यासाठी व सहभागासाठी आणि कृतीत उतरविण्याकरीता विविध माध्यमांव्दारे जनजागृती केली जाणार आहे.
बॉक्स
खातेप्रमुख देणार भेटी
जिल्हा परिषदेच्या सुजलाम अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी जिल्हास्तरावरून संनियंत्रण करण्यासाठी अभियान कालावधीत जिल्हास्तरावरील जिल्हा कक्ष आणि विविध विभागाचे खातेप्रमुख यांच्या क्षेत्रिय ग्रामपंचायतींना भेटी देणार आहेत.
कोट
जिल्ह्यात १०० दिवसांचे स्थायित्व व सुजलाम अभियानातंर्गत हागणदारीमुक्त श्वाश्वतता टिकविण्यासाठी जिल्हाभरात ४० हजार शोषखडयांची निमिर्ती केली जाणार आहे.
अविश्यांत पंडा
मुख्यकार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद
ददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददद