अमरावती : अमरावती मतदार संघातून काँग्रेसचा हात सोडत अजित पवार गटात सामील झालेल्या सुलभा खोडके ५४९६ मतांनी विजयी झाल्या आहेत. सुलभा खोडके यांना ६००८७ मिळाली. काँग्रेसचे सुनील देशमुख यांना ५४६७४ मते घेत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेत तर आझाद समाज पार्टीचे उमेदवार अलीम पटेल यांना ५४५९१ मते मिळाली. महाराष्ट्राच्या विदर्भात असलेला अमरावती मतदारसंघ विधानसभा निवडणुकीत महत्त्वाचा मतदारसंघ आहे. शहरी आणि ग्रामीण मतदारांच्या मिश्रणासाठी ओळखल्या जाणाऱ्या ह्या मतदारसंघात पारंपारिकपणे जोरदार राजकीय स्पर्धा पाहिली गेली आहे.
२०२४ च्या निवडणुकीत सुलभा संजय खोडके (NCP) विरोधात सुनील पंजाबराव देशमुख (INC), आणि अपक्ष जगदीश गुप्ता यांच्यासह 22 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. २०१९ मध्ये काँग्रेसला पराभूत करून राष्ट्रवादीकडे सध्या ही जागा होती, तर भाजप या जागेचा प्रबळ दावेदार समजल्या जात होता. या प्रदेशाच्या राजकीय ट्रेंडवर महत्त्वाचे परिणाम आहेत. २० नोव्हेंबरला झालेल्या मतदानाचे निकाल आज स्पष्ट होतील
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला स्पष्ट कौल दिला आहे. निकालापूर्वी बरेच तर्क वितर्क लावत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये तगडी फाईट असल्याचे सांगत होते पण निकालानंतर आलेल्या आकडेवारीवरून महायुतीला बहुमत मिळत स्वतंत्रपणे सत्ता स्थापनेचा दावा करू शकते.