अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयात बुधवारी पाणीपुरवठा खंडित झाल्याने वाॅर्डात उपचारार्थ भरती असलेल्या रुग्णांना प्रचंड त्रास सोसावा लागला. पहाटे पाणी येत नसल्याने परिचारिका, कर्मचारी हेसुद्धा त्रस्त झाले. सफाईची कामे खोळंबली.
--------------------
बापट चौकात रस्ता नादुरुस्त
अमरावती : स्थानिक सरोज चौेक ते बापट चौकादरम्यान रस्ते निर्मितीची कामे ठप्प असल्याने बापक चौकातील रस्ता नादुरुस्त झाला आहे. गिट्टी रस्त्यावर पडली असून, वाहन चालकांना ये-जा करणे कठीण झाले आहे. रस्ता निर्मितीची कामे सुरू करावी, अशी मागणी आहे.
--------------------
तहसील कार्यालयातील शौचालयात दुर्गंधी
अमरावती : येथील तहसील कार्यालयातील शौचालयाची दैंनदिन स्वच्छता करण्यात येत नसल्याने या भागात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. नागरिक कामकाजानिमित्त् दरराेज येत असताना शौचालयाच्या घाणीमुळे आरोग्य धोक्यात आले आहे. या समस्येकडे संबंधितांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
-----------------------------
रॉयली प्लॉट मार्गावर वाहनांचा ठिय्या
अमरावती : स्थानिक रॉयली प्लॉट मार्गावर वाहने उभी करण्यात येत असल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. हा मार्ग रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाणारा असून, जड वाहनेदेखील रस्त्यावर उभी केली जातात, असे चित्र आहे.
----------------------------
विद्यापीठात वृक्षांना रंगरंगोटी
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात येत्या काही दिवसांत ‘नॅक’ तपासणी होणार आहे. त्यानुसार प्रशासनाने तयारी चालविली असून, इमारतीच्या रंगरंगोटीसह वृक्षांच्या बुंध्यांनाही रंग दिला जात आहे. सफाईची कामे वेगाने करण्यात येत आहे.