धुरळणी, फवारणी नावालाच
मोर्शी : शहरात सध्या कोरोनाचा उद्रेक वाढलेला असतानासुद्धा नगरपरिषदेकडून राबविण्यात येणाऱ्या फवारणी धुवारणीच्या मोहिमेला सध्या ब्रेक लागला आहे. पहिल्या लाटेच्या दरम्यान झालेली कोरोनाची रुग्णवाढ लक्षात घेता शहरात मोठ्या प्रमाणात फवारणीसाठी नगरपरिषदेने वाहनांची देखील व्यवस्था केली होती. मात्र, पहिल्या लाटेच्या तुलनेत आता पालिकेच्या स्वच्छता विभागाला त्याचा विसर पडला आहे.
----------------
चार्जशीट दाखल न करण्याचे नागपूर खंडपीठाचे आदेश
नांदगाव पेठ : बिझिलँडमधील एका कापडाचे दुकान सुरू असल्याची माहिती प्रशासनाला दिली म्हणून दुकानाच्या संचालकाने नांदगाव पेठ पोलिसांत ग्रामपंचायत सदस्याने खंडणी मगितल्याची तक्रार दाखल केली होती. त्याअनुषंगाने ग्रा.पं. सदस्य बलविर चव्हाण यांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केल्यानंतर खंडपीठाने पोलिसांना चार्जशीट दाखल न करण्याचे आदेश दिले आहेत.
----------
मारडा ग्रा.प.अंतर्गत नाल्या, गटारांची स्वच्छता
कु-हा : तिवसा तालुक्यातील मारडा व जहागिरपूर येथील सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांची पावसाळ्यापूर्वी स्वच्छता करण्यात आली. मारडा येथील सरपंच रविना अंबुरे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. गटारीतील पाणी रस्त्यावर वाहू लागल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले होते. परिणामी, नाल्या प्रवाही करण्यात आल्या.