वीज पडून दोघे किरकोळ जखमी
पथ्रोट : रविवारी सकाळी ७.३० च्या दरम्यान वीज पडून पथ्रोट तेलंगखडी वार्ड नं. दोन येथे राहणाºया योगेश मारोती कैकाडे (३०) व पांढरी खानापूर येथील रमेश भुरे (६०) हे दोघे जखमी झाले. ते शहानूर मौजे वागडोह येथील शेतात गेले असता वादळी पावसादरम्यान वीज पडली. त्यात ते किरकोळ जखमी झाले. त्यांना अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले.
-----------------
फोटो पी ०२ तिवसा
जुनी भारवाडीजवळ ट्रक उलटला
तिवसा: अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर तिवसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुनी भारवाडीजवळ अमरावती दिशेने नागपूर कडे जात असलेला एम एच १२ क्यु डब्लू ४८८१ हा मालवाहू ट्रक अनियंत्रित झाल्याने उलटला. ओव्हरटेक करण्याच्या नादात रविवारी दुपारी ३ वाजता ही घटना घडली. ट्रक आडवा झाल्याने वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व वाहतूक एका बाजूला वळती केली.
---------------------
वृक्ष लागवलीच्या खड्डे खोदकामात अनियमितता
शिंदी बु : वृक्ष लागवड करण्याकरिता येणाºया शिंदी टवलार रस्त्यावर सामाजिक वनीकरण विभागाअंतर्गत खड्डे खोदकाम सुरु आहे. जी कामे मजुरांच्या हाताने करायला पाहिजे ती कामे जेसीबीने साह्याने केली जात आहेत. वनरक्षक रेचे यांना माहिती दिली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. याविषयी वरिष्ठांनी चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी मो. जुबेर शेख इस्माईल यांनी केली आहे.
------------
पथ्रोट भागात पांदनरस्त्याच्या सर्वेक्षणाला सुरुवात.
पथ्रोट : शहानूर परिसरातील मौजे मलकापूर, रामापूर ते जहानपूर, थापेरा नाला ते जहानपूर या पांदन रस्त्याचे रुंदीकरण लक्षात घेता सर्वेक्षणास सुरूवात करण्यात आली आहे. शहानूर धरणाचे अतिरिक्त पाणी व पावसाळ्यात येणाºया पाण्यामुळे पांदन रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. सर्वेक्षणाला तलाठी बजरंग देवकाते, वानखेडे हजर होते.
----
तळवेल : यावर्षी चालू वर्षाच्या पीक कर्ज वाटपाला ३० एप्रिलपर्यंत स्थगिती देण्यात आली होती. ती स्थगिती लवकरात लवकर उठून शेतकºयांना यावर्षीचे पीककर्ज वाटप करण्यात यावे, अशी मागणी अनेक ठिकाणचे शेतकरी करत आहे. जिल्हा बॅकेने दखल घ्यावी, अशी आर्जव देखील शेतकरी करीत आहेत.
---------------
तिवसा तालुक्यातील कुºहा गाव प्रतिबंधित क्षेत्र
तिवसा : तालुक्यातील कुºहा गावातील कोरोना रूग्णांची संख्या पाहता हे गाव सिल करण्यात आले आहे. गावात शिरणारे मुख्य रस्ते बंद केले असून कोरोना प्रतिबंधित क्षेत्र असे मोठा फलक गावात लावण्यात आला असून नागरिकांनी अकारण बाहेर पडू नये, कोरोना नियमावलीचा अवलंब करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
----------------
शिंदी येथे ग्रामजयंती साजरी
शिंदी बु :- श्री. गुरुदेव चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. गणेशराव नागे यांनी त्यांच्या मुलाच्या नावे दोन पितळी समई दान दिल्या. कार्यक्रमाला रामराव वाठ, केशव गाडगे, शंकर वाठ, गजानन ढोरे, उमेश सांगोळे, सुभाष चिमोटे, सुखदेव फुलारी, अजय वडतकर, कैलास दुरातकर, किसन वाठ, अनंत दुधारकार, पुरुषोत्तम घुटे, सौ. शैलजा गावंडे उपस्थित होते.
--------
पथ्रोट येथे ११२ युवकांनी केले रक्तदान.
पथ्रोट : महाराष्ट्र दिनानिमित्त पथ्रोट पोलीसांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये ११२ युवकांनी रक्तदान केले यामध्ये परीसरातील राजापूर, वडगांव, बोराळा, काकडा, वडनेर भुजंग, रासेगाव, खांजमानगर, परसापूर, पथ्रोट, जनूना येथील तरूणांचा समावेश होता. ठाणेदार सचिन जाधव, एसडीपीओ पुनम पाटील, डॉ. अविनाश ऊकंड,े डॉ.अमित क्षार, मंगेश गाढवे, संगिता गायधने, मनोज सहारे, आशिष पाटील, दामिनी गोरडे, अनूपमा ठाकरे, गौतम मोहोड, कविता वानखेडे आदी उपस्थित होते.
----