पथ्रोट येथील जलसुराज्य योजना केव्हा?
पथ्रोट : शहानूर धरणाचे पाणी पथ्रोटवासीयांना मिळावे या उद्देशाने शासनाने जलसुराज्य योजना मंजूर केली. जीवन प्राधिकरणाला वर्क ऑर्डर देण्यात आली. मात्र ही योजना राबवित असताना या योजनेत अनेक अडथळे आले. त्यात कोरोनाचे सावटात ही योजना पूर्णत्वास न जाता पथ्रोटवासीयांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
---------
महावितरणचे कृषी ऊर्जा पर्व
अमरावती : महावितरणचे कृषी ऊर्जा धोरण शेतकऱ्यांना थकबाकीमुक्त करणारे आहे. त्यामुळे या अभियानाच्या लाभापासून कुणीही वंचित राहू नये, याची माहिती जिल्ह्याच्या सर्व कृषी ग्राहकांना मिळावी, यासाठी १ मार्च ते १४ एप्रिल दरम्यान महावितरणचे 'कृषी ऊर्जा पर्व' राज्यभर राबविण्यात आले. कृषी पर्वाच्या माध्यमातून १८ कलमी कार्यक्रमाव्दारे महाकृषी अभियानाची जनजागृती करण्यात आली.
------------
फोटो पी १७ राजेंद्र कानुगो
राजेंद्र कानूगो
वरूड : बाजार समितीचे माजी संचालक राजेंद्र बिहारीलाल कानुगो (८५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. नगरसेवक हरीश कानुगो यांचे ते वडील होते. त्यांचे पश्चात तीन मुले, सुना नातवंडे असा आप्त परिवार आहे.
--------
फोटो पी १७ देविदास देशमुख
देवीदास देशमुख
वरूड : टेम्भुरखेडा येथील माजी सरपंच देवीदास भगवान देशमुख (६५) यांचे नागपूर येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुली, सुना, नातवंडे असा आप्तपरिवार आहे.
---------
फोटो पी १७ शिबिर
श्रीकृष्ण भक्त मंडळ, ग्राहक पंचायतकडून रक्तदान
अमरावती : स्थानिक श्रीकृष्ण मंडळ व ग्राहक पंचायतच्या संयुक्त विद्यमाने रविवारी नरहरी मंगल कार्यालय, पूजा कॉलनी येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. यात ५० जणांनी रक्तदान केले. शिबिराच्या यशस्वीतेकरिता सतीश ढेपे, विजय अनासाने, राजेंद्र काकडे, सचिन पाटणे, गजानन मुदगल, रवींद्र डकरे, प्रशांत चौधरी आदी पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
-----------
मोर्शी उपजिल्हा रुग्णालयात साहित्य वाटप
मोर्शी : पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश काळे यांच्या मार्गदर्शनात उपजिल्हा रूग्णालय, नेरपिंगळाई आरोग्य केंद्र, विचोरी आरोग्य केंद्र येथे पीपीई किट, सॅनिटायजर, ऑक्सिजन मशीन, हॅन्डग्लोज वाटप करण्यात आले. यावेळी गजानन ठवळी, मनोज टेकाळे, पिंट्टू काळमेघ उपस्थित होते.
--------