‘अमरावती कोविड हेल्प’ या संकेत स्थळाचे लोकार्पण
अमरावती : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती व अंबा कार्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या ‘अमरावती कोविड हेल्प’ या संकेत स्थळाचा लोकार्पण सोहळा सोमवारी पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अमरावती विभाग संघचालक चंद्रशेखर भोंदू, महापौर चेतन गावंडे, महानगर संघचालक सुनील सरोदे उपस्थित होते. अंबा कार्टचे संजय गुंबळे यांनी महापालिकेच्या साहाय्याने हे संकेत स्थळ तयार केले.
----------------
बियाणे व खते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर
रिद्धपूर : खरीप हंगामासाठी मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना बियाणे व खते थेट त्यांच्या गावात, शेताच्या बांधापर्यंत पोहचविण्यासाठी कृषी विभागामार्फत नियोजन करण्यात येत आहे. या उपक्रमामध्ये सर्वांना सहभागी होण्याकरिता प्रोत्साहित करावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी कल्पना राठोड, कृषिसहायक अंकुश ढेमरे यांनी केले.
----------
स्वाध्याय उपक्रमाला स्थगिती देण्याची मागणी
अमरावती : १५ मे पासून स्वाध्याय उपक्रम राबविण्याबाबतच्या सूचना विद्या प्राधिकरणाच्यावतीने प्राप्त झाल्या आहेत. शिक्षक सध्या पोलीस नियंत्रण कक्ष, तपासणी नाके, गाव सर्वेक्षण, लसीकरण आदी कामांच्या कर्तव्यावर आहे. त्यामुळे या उपक्रमाचा अतिरिक्त ताण शिक्षकांवर येणार आहे. त्यामुळे 'स्वाध्याय' उपक्रम तात्पुरता स्थगित करून जुलै महिन्यापासून नव्याने राबविण्यात यावा, अशी मागणी प्रहार शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष महेश ठाकरे यांनी केली आहे.
------------
शिक्षकांची पदोन्नती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवा
अमरावती : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये तसेच शिक्षण विभागाच्या प्रशासकीय यंत्रणेत विविध पदांच्या अनेक जागा रिक्त आहेत. या सर्व जागा शिक्षकांमधून पदोन्नतीने भरण्यात याव्यात. पदोन्नतीची व समुपदेशनाची ही प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पाडावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष गोकुलदास राऊत यांनी केली आहे.
---------
फोटो पी १८ वरूड पाहणी
वरूड तालुक्यात झालेल्या नुकसानाची पाहणी
वरूड : तालुक्यात १६ मे रोजी रोजी मोठ्या प्रमाणात झालेल्या वादळी पावसामुळे घरांसह पिकांचे आणि फळबागांचेही नुकसान झाले आहे. या नुकसानाचे तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत मिळण्यासाठीचा अहवाल शासनाकडे सादर करावा, असे निर्देश आमदार देवेंद्र भुयार यांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांना दिले. आमनेर, ढगा, घोराड, बाभूळखेडा, पोरगव्हाण, आमपेंड, बेसखेडा, मोर्शी खुर्द, वेढापूर, एकदरा वाठोडासह वरूड तालुक्यातील ५५० ते ६०० घरांचे व गुरांच्या गोठ्यांचे नुकसान झाले.
--------
बोधीवृक्षाचे रोपण करुन पालकमंत्यांचा वाढदिवस
शेंदोळा खुर्द : पालकमंत्री यशोमती ठाकुर यांचा वाढदिवस बोधिवृक्षाची लागवड करून साजरा झाला. यावेळी सुरेश साबळे, सरपंच अर्चना चिकटे
उपसभापती शरद वानखड, उपसरपंच रोशन खडसे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गुणवंतराव ऊमप, पोलीस पाटील दिनेश इंगोले, माजी उपसरपंच मनोज माहुलकर, वामनराव भोयर, उमेश भोयर, सतिश खरकाडे, संजय चिकटे, हरिदास आगाशे, आकोटकर व ग्रा. पं कर्मचारी उपस्थित होते.