अचलपूर : तालुक्यातील शिंदी बु. येथे नितीन गंगाधर सोनार (३७) व त्यांच्या आईला मारहाण करण्यात आली. उसणवार दिलेले पैसे परत मागितले असता, १२ मे रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी पथ्रोट पोलिसांनी शरद ढेपे, अनिकेत ढेपे, बाबू ढेपे व एक महिला (सर्व रा. पथ्रोट) यांचेविरूद्ध गुन्हा दाखल केला.
--------------
काशीखेड मार्गावरून रेतीचा ट्रक जप्त
धामणगाव रेल्वे : काशीखेड ते जळगाव आर्वी कालवे मार्गावर १० ब्रास रेतीची अवैध वाहतूक करणारा एमएच बीएक्स ३०६० हा ट्रक जप्त करण्यात आला. दत्तापूर पोलिसांनी आरोपी सचिन मातबदे, बबलू शेख (दोघेही रा. पेठ रघुनाथपूर), विशाल खडसे (लोयानगर) यांचेविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------
तळेगाव ठाकूर येथे विद्युत करंटमुळे मृत्यू
ुतिवसा: तळेगाव ठाकूर येथील संताराम शामरावजी थोरात (६४) यांचा स्वत:च्या शेतात लावलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने मृत्यू झाला. १७ मार्च रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी तिवसा पोलिसांनी मृताविरूद्ध १७ मे रोजी गुन्हा नोंदविला. वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी त्यांनी तारेचे कुंपण लावून त्यात विद्युत प्रवाह सोडला होता.
------------
परतवाड्यात तरुणाला चावा, वाहन फोडले
परतवाडा : स्थानिक गोतमारे प्लॉट येथे सूर्या चंद्रा गौडा (३३) यांच्या डाव्या गालावर चावा घेण्यात आला. तर केए १३ पी १०८७ या चारचाकी वाहनावर दगड मारून नुकसान करण्यात आले. १७ मे रोजी याप्रकरणी परतवाडा पोलिसांनी आरोपी प्रकाश भास्कर (रा. पांढरी, ता. अचलपूर) विरूद्ध गुन्हा दाखल केला.
------------
चोपन बिटमधील ट्रॅप कॅमेरा लंपास
धारणी : तालुक्यातील चोपण बिटमधील जंगलात लावलेले दोन ट्रॅप कॅमेरे लंपास करण्यात आले. १५ ते १७ मे रोजी ही घटना घडली. याप्रकरणी धारणी पोलिसांनी वनरक्षक सारनाथ भगत (२८) यांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला.
----------------
पानाभुरा वनखंडातून ट्रॅप कॅमेरे लांबविले
धारणी : तालुक्यातील पानाभुरा वनखंडातून १८ हजार रुपये किमतीचे दोन ट्रॅप कॅमेरे लंपास करण्यात आले. ११ ते १५ मे दरम्यान हा प्रकार घडला. धारणी पोलिसांनी वनरक्षक सतीश गिरनुले (३८) यांच्या तक्रारीवरून १७ मे रोजी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला.
---------------
माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ
नांदगाव खंडेश्वर : माहेरहून पैसे आण, अन्यथा फाशी देऊन मारून टाकेन, अशी धमकी देत एका २६ वर्षीय विवाहितेचा छळ करण्यात आला. याप्रकरणी नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी आरोपी माधव जिरे, रामराव जिरे व एक महिला (सर्व रा. मिरासे खोपडी, दारव्हा) यांचेविरूद्ध गुन्हा दाखल केला.
---------------
सावंगा आसरा येथे इसमाला मारहाण
माहुली : अमरावती तालुक्यातील सावंगा आसरा येथे एका इसमाला गंभीर जखमी करण्यात आले. १७ मे रोजी वाद सोडविण्यासाठी गेला असता, हा प्रकार घडला. याप्रकरणी माहुली पोलिसांनी जखमीचा मोठा भाऊ जगदेव गोपाळराव खेडकर (६०) यांच्या तक्रारीवरून आरोपी गजानन नांदणे व महेंद्र कलाने (३५, दोन्ही रा. सावंगा आसरा) यांचेविरूद्ध गुन्हा दाखल केला.
-------------------
शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा
अमरावती : रोना महामारीमुळे पैशाची आवक नाही. वीजबिल भरले नाही तर थकीत कर्जदार होण्याची भीती आणि कर्जाची परतफेड केली तर वीज कनेक्शन खंडित होण्याची भीती, अशी द्विधा मनस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. शासनाने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्याची घोषणा केली होती. शेतकऱ्यांनी घरातील दाग-दागिने विकून, गहाण ठेवून, नातेवाइकांकडून उसने पैसे घेऊन कर्जाची परतफेड केली. मात्र, वर्षभराचा कालावधी लोटला तरी अनुदानाचा पत्ता नाही.
----------------
रसुलापूर रस्ता बांधकामात निकृष्टतेचा आरोप
चांदूर बाजार : तालुक्यातील रसुलापूर ते धानोरा या डांबरी रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. या कामात निकृष्ट साहित्याचा उपयोग केला जात आहे. यामुळे स्थानिक सरपंच, सदस्यांसह नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांकडे तक्रार दाखल केली आहे. रसुलापूर ते धानोरा या १.३ किलोमीटर डांबरी रस्त्याचे काम सुरू आहे.
--------------
चांदूर रेल्वेतील अतिक्रमण जैसे थे
चांदूर रेल्वे : शहरालगत रेल्वे गेटजवळील दुकाने हटविण्यात यावी, अशी मागणी उपविभागीय अधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. रेल्वेगेटसमोर दुकानांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दुकानेही रोडला एक फूट लागूनच आहेत. एका दुकानापासून सुरुवात होऊन आता १२ ते १४ दुकाने झालेली आहेत. शहरातही अतिक्रमणाची तीच परिस्थिती आहे.
-------------------
मेळघाटातील रस्त्यांची दुरुस्ती कधी?
चिखलदरा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वाढत्या सीमारेषा पाहता दोन वर्षांपासून रस्त्यांची कामे बंद पडली आहेत. परिणामी खड्डेमय झालेल्या रस्त्यांची परवानगी न दिल्याने कोट्यवधी रुपयांचा निधी परत जाण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. दरवर्षी पावसाळ्यात मेळघाटात दरड कोसळून वाहतूक बंद होते. त्याअनुषंगाने रस्त्यांची डागडुजी पावसाळ्याआधी व्हावी, अशी मागणी होत आहे.
-------------