शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
2
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
4
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
5
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
6
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
7
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
8
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
9
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
10
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
11
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
12
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
13
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
14
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
15
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
17
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
18
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
19
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
20
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या

सारांश बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 4:11 AM

नांदगाव खंडेश्वर : नागपूर ते औरंगाबाद हायवेवर भरधाव कार रोडच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला धडकल्याने झालेल्या अपघातात एका तरुणासह ...

नांदगाव खंडेश्वर : नागपूर ते औरंगाबाद हायवेवर भरधाव कार रोडच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला धडकल्याने झालेल्या अपघातात एका तरुणासह दोघे जण ठार झाले. १९ मे रोजी रात्री ८.३० च्या सुमारास हा अपघात घडला. कार्तिक संतोष चौधरी (२७, रा.पेशवे प्लॉट, यवतमाळ) याचेसह अन्य एकाचा मृतात समावेश आहे. चालक कार्तिक याने एमएच २९ एडी ०४५९ ही कार भरधाव वेगाने चालविली. याप्रकरणी मृताविरूद्ध मंगरूळ चव्हाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

--------------

आंबे तोडण्यावरून पाडीदम येथे मारहाण

धारणी : शेतातील झाडाचे आंबे का तोडले, अशी विचारणा केली असता, रामू कासदेकर (५२, पाडीदम) यांना काठीने मारहाण करण्यात आली. २० मे रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी धारणी पोलिसांनी राम कासदेकर, इसू कासदेकर, संदीप कासदेकर व एका महिलेविरूद्ध गुन्हा दाखल केला.

----------

इसंब्री शिवारातून दुचाकी लंपास

वरूड : तालुक्यातील इसंब्री शिवारातून दुचाकी लंपास करण्यात आली. २० मे रोजी ही घटना घडली. एमएच २७ के ४७१६ या दुचाकीधारक आशिष लोखंडे (४०, वरूड) यांच्या तक्रारीवरून वरूड पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला.

------------

दर्यापुरात महिलेचा विनयभंग

दर्यापूर : येथील एका महिलेचा विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी रमेश धानोरकर (६०) व राठोड (४४, रा. सौदागरपुरा) यांचेविरूद्ध दर्यापूर पोलिसांनी कलम ३५४ अ, ४५२, २९४, ३२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्या महिलेला शिवीगाळ करण्यात आली. १९ मे रोजी हा प्रकार घडला.

-----------

हयापूर येथे वृद्धाला मारहाण

दर्यापूर : तालुक्यातील हयापूर येथे रामसिंग राणे (६५) यांना काठीने मारहाण करण्यात आली. शेतीच्या वादातून २० मे रोजी ही घटना घडली. याप्रकरणी खल्लार पोलिसांनी आरोपी गणेश रामसिंग राणे (४०, हयापूर) विरुदध गुन्हा दाखल केला.

-------------

सातेगाव येथे तरुणाची फसवणूक

अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील सातेगाव येथे एका १८ वर्षीय तरुणाची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. मोबाईलवर ऑनलाईन खरेदी करीत असताना फेक कस्टमर केअरकडून फ्रॉड लिंक पाठविण्यात आली. ५ ते ९ मे रोजी दरम्यान ही घटना घडली. रहिमापूर पोलिसांनी याप्रकरणी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला.

---------------

शिक्षकांच्या कुटुंबीयांना कोरोना लस उपलब्ध करून द्या

अमरावती : जिल्ह्यातील काही अपवाद वगळता बहुतांश शिक्षकांना लसीचा पहिला डोस न देता कोरोनाच्या ड्युटीवर नियुक्त केलेले आहे. दुसऱ्या डोसबद्दल विचारही केला जात नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शिक्षक कर्मचाऱ्यांबरोबर त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना ही लस देण्यात यावी, अशी मागणी शिक्षक समितीने केली.

------------

कृषी विभागाद्वारे पीक व्यवस्थापनावर ऑनलाईन मार्गदर्शन

शिंदी बु : पीक व्यवस्थापन याविषयावर तालुका व उपविभागीय कृषी कार्यालय अचलपूरद्वारा ऑनलाईन मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले होते. श्री शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावतीचे जितेंद्र दुर्गे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी जी.टी.देशमुख, तालुका कृषी अधिकारी प्रफुल्ल सातव, मंडळ कृषी अधिकारी रूपाली इंगळे व पूजा गायकवाड, कृषी सहायक सतीश फत्तेपुरे उपस्थित होते.

-----------

विद्यापीठाच्या अभ्याक्रमात आता एनसीसी विषयाचा समावेश

अमरावती : सिनेट सदस्य मनीष गवई यांच्या प्रयत्नाने विद्यापीठाच्या अभ्याक्रमात आता एनसीसी विषयाचा समावेश करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना पुढच्या शैक्षणिक वर्षांपासून एनसीसी वैकल्पिक विषय घेता येणार असून, एनसीसीच्या सामाजिक चळवळीला बळकटी मिळणार आहे.

-----------

फोटो पी २२ शिरखेड

मनोज काळे यांना राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार

शिरखेड : राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानच्यावतीने यंदाचा राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार नया वाठोडा येथील शेतकरी मनोज काळे यांना बांधावर देण्यात आला. यावेळी पौर्णिमा सवई, भाऊराव काळे व जि. प.सदस्य प्रकाश साबळे, संदीप रोडे, प्रकाश निंभोरकर, पवन घोरमाडे, नीलेश वानखडे, राहुल काकडे, धीरज काळे, वैभव पांडे, स्वप्निल निंभोरकर, अंकुश वानखडे, दीपक बाभूळकर उपस्थित होते.

-------------

नवाथे येथे १५० जणांची रॅपिड अँटिजेन टेस्ट

अमरावती : शहरात विनाकारण शहरात फिरत असलेल्या १५० नागरिकांची नवाथे नगर येथे रॅपिड टेस्ट करून घेण्यात आली. सदर मोहिमेत सहायक आयुक्त विशाखा मोटघरे, भाग्यश्री बोरेकर व सहायक आयुक्त प्राची कचरे, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक राजू ढिक्याव, स्वास्थ्य निरीक्षक विनोद टांक, सोपान माहुलकर, इम्रान खान, कनिष्ठ अभियंता रोंघे, अढाऊ तसेच परिहार, राजेश चावरे, अजय चावरे, निकम, बिटप्यून नरेंद्र डुलगज, पंकज धवसेल व मनपा कर्मचारी उपस्थित होते.

----------

आसेगावात प्रहारचे थाळीनाद आंदोलन

आसेगाव पूर्णा : खरीप हंगामाच्या तोंडावर केंद्र सरकारने रासायनिक मिश्र खताच्या किमतीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. या दरवाढीविरोधात प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने स्थानिक बसस्थानकावर थाळीनाद आंदोलन करून केंद्र शासनाचा निषेध करण्यात आला. यावेळी प्रहारचे ज्येष्ठ कार्यकर्ते मोहन नेरकर, राजेश वाटाणे, प्रशांत नागापूर, भैया मानकर, गजानन ठाकर, नितीन घोंगे उपस्थित होते.

-------------

खरीप तोंडावर, दरवाढ मागे घ्या

अचलपूर : खरीप हंगामाच्या तोंडावर खतांच्या किमतीत केलेली दरवाढ मागे घेण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अचलपूर तालुका अध्यक्ष गजानन खंडोकार व शहराध्यक्ष तथा नगरसेवक सल्लू यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे. इंधन दरवाढीमुळे शेती उत्पादन खर्च वाढला. परिणामी, शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. सबब, ही दरवाढ मागे घ्यावी, अशी विनंती करण्यात आली.

---------