धारणी : तालुक्यातील सोनबर्डी ते खाऱ्या टेंभरू मार्गावरून अवैध रेतीची चोरी करताना ट्रॅक्टर जप्त करण्यात आला. २१ मे रोजी पहाटे धारणी पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी आरोपी शिवदास सावलकर (३५, रा. खाऱ्या टेंभरू) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
------------
भोकरबर्डी शिवारातून मोबाईल लांबविला
धारणी : मासेमारी करण्यास गेलेल्या रविकुमार निमोडे (रा. कळमखार) याचा १० हजार रुपये किमतीचा मोबाईल भोकरबर्डी शिवारातून लंपास करण्यात आला. २१ मे रोजी धारणी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
केला. ------------
‘त्या’ अपघातप्रकरणी मृताविरुद्ध गुन्हा
चिखलदरा : आकी ते धरमडोह मार्गावर झालेल्या अपघातप्रकरणी २१ मे रोजी मृताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. २६ एप्रिल रोजी हा अपघात घडला होता. गजानन मावस्कर (३५) हा एमएच २७ एएम ६८०६ क्रमांकाच्या दुचाकीने जात असताना, ती दगडावर आदळली होती. त्याचा २७ एप्रिल रोजी जखमी झाल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
-----------------
ऑटोरिक्षाच्या धडकेत महिला प्रवासी ठार
अमरावती : मालवाहू वाहनाने दिलेल्या धडकेत प्रवासी ऑटोरिक्षामधील महिलेचा मृत्यू झाला. १९ मे रोजी पहाटे ६ च्या सुमारास मोर्शी ते माहुली जहागीर मार्गावरील करजगाव फाट्यावर हा अपघात घडला. अफसानाबानो अ. कलीम (३८) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी एमएच २७ बीडब्ल्यू ०५७८ क्रमांकाच्या मालवाहू ऑटोरिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
------------
पिली येथे तरुणाला मारहाण
चांदूर बाजार : स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिली बाजार येथे रमेश कासदेकर (३२) याच्यावर कुऱ्हाडीने वार करण्यात आले. बँँकेतून पाच लाख का काढले, अशी विचारणा केली असता, २१ मे रोजी हा प्रकार घडला. चांदूरबाजार पोलिसांनी आरोपी अनिल कासदेकर (३०, रा. पिली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
-----------
सुपलवाडा येथे महिलेला मारहाण
तळेगाव दशासर : धामणगाव रेल्वे तालुक्यातील सुपलवाडा येथे एका ७८ वर्षीय महिलेला मारहाण करण्यात आली. १९ मे रोजी सकाळी हा प्रकार घडला. याप्रकरणी तळेगाव दशासर पोलिसांनी आरोपी अंतेश्वर बगाडे (६०) व एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला.
----------
भातकुलीत कोविड सेंटर का नाही?
भातकुली : जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांच्या ठिकाणी कोविड केअर सेंटर आहे. फक्त भातकुली याच ठिकाणी ते नाही. जिल्हा परिषद अंतर्गत नवीन २० कोविड केंद्रे उभारण्यात येणार असून, त्यातही भातकुलीला वगळले आहे. भातकुली तालुक्याचे कोविड केअर सेंटर वाठोडा शुकलेश्वर येथे होणार आहे. ते भातकुलेत व्हावे, अशी तालुकावासीयांची मागणी आहे.
----------------
फोटो पी २३ कसबेगव्हाण
कसेबेगव्हाण ग्रामपंचायतने राबवली पंचसूत्री
अंजनगाव सुर्जी : कसबेगव्हाण ग्रामपंचायतने उत्कृष्ट नियोजन करून कोरोनाला गावाबाहेर रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या. गाावात करण्यात आलेल्या उपाययोजनांची व जिल्हाधिकाऱ्यांनी जे आदेश निर्गमित केले, त्यांसह कोरोनासंदर्भातील सर्व माहिती गावकऱ्यांना देण्यात येते. सोबतच संपूर्ण गावात जंतुनाशक फवारणी करण्यात येत आहे.
----------
खरवाडी मार्गावर रेतीची अवैध वाहतूक
चांदूर बाजार : तालुक्यातील खरवाडी ते आखतवाडा रोडवरील नाकाबंदीदरम्यान रेतीची अवैध वाहतूक करणारी ट्रॅक्टर ट्रॉली, मोबाईल, दुचाकी व रेती असा एकूण ५ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. याप्रकरणी भैया धाकडे (रा. कुरळपूर्णा), शैलेश अर्डक (रा. शिरजगाव अर्डक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
-----
चांदूर बाजार तालुक्यात रेतीचे उत्खनन
चांदूर बाजार : तालुक्यातील काही नदीपात्रातून रेती तस्करी होऊ नये, यासाठी महसूल यंत्रणेकडून उपाययोजना राबविल्या गेल्या. त्यामुळे तस्करांनी त्या जागा सोडून नदीच्या दुसऱ्या काठावरून रेतीचे उत्खनन सुरू केले आहे. मासोद, फुबगाव, शिरजगाव कसबा, घाटलाडकी, ब्राह्मणवाडा थडी, करजगाव या भागातून मोठ्या प्रमाणात रेती तस्करी होत आहे.
----------
वनक्षेत्रात कृत्रिम पाणवठ्याची निर्मिती
पोहरा बंदी : चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रातील चिरोडी वतुर्ळात वनखंड क्रमांक ३१० मध्ये कृत्रिम पाणवठा नुकताच निर्माण करण्यात आला आहे. या जंगलामध्ये नैसर्गिक व कृत्रिम पाणवठे असून, उन्हाळ्याचे संकेत लागताच पाण्याच्या शोधात वन्यप्राणी जंगलाबाहेर जाऊ नये, यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे.
-----------
वरूडची कोरोनास्थिती हाताबाहेर
वरूड : २०२० च्या एप्रिल महिन्यापासून सुरू झालेला कोरोनाचा संसर्ग वर्षभरानंतरही थांबलेला नाही. प्रशासनाचे कंटेनमेंट व बफर झोन कागदावरच आहेत. केवळ आरोग्य यंत्रणा सतर्क असून, तपासण्या आणि लसीकरण मोहीम प्रामाणिकपणे सुरू आहे. आता तर रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आल्यास, त्याला बेनोडा कोविड केअर सेंटरमध्ये पाठविले जात नाही, तर घरीच विलगीकरणात ठेवले जाते. संबंधितालाच औषधोपचाराचा खर्च करावा लागतो.
-----------
मोर्शी तालुक्यात अवैध रेती वाहतूक
नेरपिंगळाई : मोर्शी तालुक्यातील नदीपात्रातील वाळूची अवैध वाहतूक केेली जात असल्याचा प्रकार विचोरी ते अडगाव मार्गावर उघड झाला होता. ९ एप्रिल रोजी या मार्गावरून अवैध रेतीची वाहतूक करणारी ट्रॅक्टर ट्रॉली जप्त करण्यात आली. आतादेखील ते सत्र सुरूच आहे.
------------------