ग्रामसभा ऑनलाईन असाव्यात
गणोरी : सन २०२१-२२ चा वार्षिक कृती आराखडा मंजूर होणे गरजेचे असल्याने विशेष बाब म्हणून शासनाने ऑनलाइन ग्रामसभांना मान्यता द्यायला हवी, अशी मागणी गणोरी येथील ग्रामपंचायत सदस्य प्रतीक्षा भारसाकळे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली.
-------------
अंजनगावात ‘माझा मित्र परिवार’च्यावतीने भुकेल्यांना अन्न
अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील ‘माझा मित्र परिवार’च्यावतीने गोरगरीब, गरजूंना जेवणाचा डबा दिला जात आहे. यात वैभव खारोडे, जयेश सैतवाल, आकाश गांधी, श्रीकांत ठाकरे, स्वप्निल घुरडे, नीलेश गाडगे, युवराज गिते, प्रज्ञेश होरे, सक्षम पुनसे, प्रशांत कडू, आशिष खारोडे, पीयूष घेरकर, विठ्ठल ढोले, निखिल पटेल, आनंद बेलसरे, वैभव गोळे सहभागी आहेत.
--------------
फोटो पी २५ तळवेल
‘रासायनिक खते बियाणांची तजवीज करा’
तळवेल : शेतकऱ्यांना जुन्या दरापेक्षा ५० टक्के कमी दराने रासायनिक खते व बियाणांची मुबलक उपलब्धता करून द्यावी, अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टीच्या चांदूर बाजार तालुका शाखेच्यावतीने करण्यात आली. यावेळी गौरव किटुकले, सागर शिंगाडे, वसीम राजा, अफसर अली, किरण इंगळे आदी उपस्थित होते.
---------
सुपर स्पेशालिटीला मिळाले व्हेंटिलेटर
अमरावती : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला १० व्हेंटिलेटर दिले. सोमवारी त्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी डॉ. सुनील देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, शिवराय कुळकर्णी, किरण पातूरकर, रवींद्र खांडेकर, मंगेश खोंडे, श्याम जोशी, अभय बपोरीकर, प्रवीण वैश्य प्रामुख्याने उपस्थित होते.
------------