वरूड : येथील आंडेवाडी भागातून एमएच ४० ई ९८६२ या क्रमांकाची दुचाकी चोरीला गेली. २२ मे रोजी दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी वरूड पोलिसांनी प्रकाश परतेकी (४६, वरूड) यांच्या तक्रारीवरून २४ मे रोजी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला.
------------
बेलोना येथून ५. ५० लाख लंपास
बेनोडा : वरूड तालुक्यातील बेलोना येथून तब्बल ५.५० लाखांची रोकड लांबविण्यत आली. २३ ते २४ मेदरम्यान ही घटना घडली. तेथील एका महिलेने १०० मेंढरे, बकºया विकून ४.५० लाख रुपये जमा केले. आधीचे एक लाख मिळून एकूण ५.५० लाख रुपये त्यांनी बेडच्या खाली व त्यावर वाकळा टाकून दोरीने बांधून ठेवले होते. ती रक्कम चोरीला गेली. याप्रकरणी बेनोडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
----------------
हसनापूर फाट्यावरून दुचाकी लंपास
अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील हसनापूर फाट्यावरून एमएच २७ सीएस ७८६४ या क्रमांकाची दुचाकी लंपास करण्यात आली. २४ मे रोजी सकाळी ही घटना घडली. अंजनगाव सुर्जी पोलिसांनी याप्रकरणी याकुबखान मिया खान (६७, रा. भंडारज) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
-------------
लग्न करण्याचा तगादा लावून विनयभंग
अंजनगाव सुर्जी : येथील एका तरुणीला लग्नाचा तगादा लावत तिची सामाजिक बदनामी करीत असल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी अंजनगाव पोलिसांनी एका ३२ वर्षीय आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
--------------
गोकुळसरा येथे महिलेला मारहाण
धामणगाव रेल्वे : तालुक्यातील गोकुळसरा येथे एका ६५ वर्षीय महिलेला बके टने मारहाण करण्यात आली. तिच्या मुलाला शिवीगाळ करण्यात आली. सार्वजनिक नळावर पाणी भरत असताना २४ मे रोजी हा वाद झाला. याप्रकरणी मयूर महल्ले व एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
---------------
चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेचा छळ
तळेगाव दशासर : चारित्र्यावर संशय घेऊन एका विवाहितेचा छळ करण्यात आला. माहेरून पैसे आणण्यासाठी तगादा लावण्यात आला. २४ मे पूर्वी शिरपूर येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी तळेगाव दशासर पोलिसांनी आरोपी विकेश हाडके व एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला.
------
चांदूर रेल्वेत तरुणाला मारहाण
चांदूर रेल्वे : येथील शिवाजीनगर भागात राहणाऱ्या स्वप्निल ढोके (२५) याला मारहाण करण्यात आली. २४ मे रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी चांदूर रेल्वे पोलिसांनी आरोपी कुणाल सहारे (२०, श्रीकृष्णनगर) विरूद्ध गुन्हा दाखल केला.
------------