शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय; गायीला दिला 'राज्यमाते'चा दर्जा
2
“मविआ १८० जागा जिंकेल, फडणवीसांनी महायुतीचा विरोधी पक्षनेता ठरवावा”: बाळासाहेब थोरात
3
"देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा", सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री चंद्राबाबूंना झापले 
4
शिंदे गटातील आमदाराविरोधात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा; हजारोंची गर्दी, काय आहे प्रकरण?
5
वर्षभरात अर्धी होतेय Smarphones ची किंमत; 'दिल मांगे मोअर'च्या नादात तुमचं मोठं नुकसान तर होत नाहीये ना?
6
फिल्मी क्विनचा लक्झरी 'अंदाज'...! कंगना रणौतनं बंगला विकून काय केलं खरेदी? मोजले तब्बल 3 कोटी
7
जपानचे नवे पंतप्रधान चीनला शिकवणार धडा; नवा प्लॅन पाहून ड्रॅगनला बसणार धडकी!
8
विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट
9
भाजपाला दिली २१ जागांची यादी, ३ महामंडळेही हवी; तिसऱ्या आघाडीवर रामदास आठवले म्हणाले...
10
प्रसिद्ध अभिनेता झाला शेतकरी, घेतलं १.५ कोटींचं कर्ज; मुलाच्या शाळेबाहेर विकावी लागली भाजी
11
टेस्टमध्ये टी-२० तडका! रोहित-यशस्वी जोडीनं सेट केला 'फास्टर फिफ्टी'चा रेकॉर्ड
12
अमेरिकेचा सीरियावर 'एअरस्ट्राइक'! हल्ल्यात ISIS, अल कायदाच्या ३७ दहशतवाद्यांचा खात्मा
13
संतापजनक! वडिलांची हत्या करून मुलांनी घरातच पुरला मृतदेह; ३० वर्षांनी उघड झालं रहस्य
14
कधीकाळी 75-80 टक्के ख्रिश्चन लोकसंख्या असलेला लेबनॉन मुस्लिम देश कसा बनला? वाचा...
15
'खटाखट'नंतर आता 'धडाधड'ची एन्ट्री...; अंबालातून राहुल-प्रियांका यांचा हल्लाबोल, भाजपवर थेट निशाना
16
१२ दिवसांत हिजबुल्लाहचा गेम फिनिश..पेजर हल्ला ते बंकर स्फोटापर्यंत इस्त्रायलचा तांडव
17
ठरलं! मनोज जरांगेंचा दसरा मेळावा होणार; म्हणाले, “१२ वाजता या, एकजूट अन् शक्ती दाखवा”
18
'ही' आहे भारतीय रेल्वेची सर्वात स्वच्छ ट्रेन, तिकिटांसाठी आधीच होतंय बुकिंग
19
विधानसभेआधी धारावीकरांसाठी सरकारची मोठी भेट; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ३८ निर्णय
20
३०० विकेट्स अन् ३००० धावांच्या कॉम्बोसह जड्डूच्या नावे झाला जम्बो रेकॉर्ड

सारांश बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2021 4:11 AM

चांदूररेल्वे : तालुक्यातील पळसखेड मार्गावर दुचाकीस्वार भावंडांना थांबवून मारहाण करण्यात आली. तथा शिवीगाळ करण्यात आली. ३० मे रोजी हा ...

चांदूररेल्वे : तालुक्यातील पळसखेड मार्गावर दुचाकीस्वार भावंडांना थांबवून मारहाण करण्यात आली. तथा शिवीगाळ करण्यात आली. ३० मे रोजी हा प्रकार घडला. चांदूररेल्वे पोलिसांनी याप्रकरणी साजिद शेख (३०, घुईखेड) यांच्या तक्रारीवरून आरोपी सुनिल पुनसे (पळसखेड), आदेश गावनर (पळसखेड) व अन्य एका विरूद्ध गुन्हा दाखल केला.

------------

तिवसा येथे मायलेकाला मारहाण

तिवसा : येथील क्रांती चौकातील दिवाकर नासरे (३५) व त्यांच्या आईला लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात आली. ३० मे रोजी भोईपुऱ्यात ही घटना घडली. याप्रकरणी तिवसा पोलिसांनी आरोपी गणेश मेश्राम व आकाश शेंडे यांचेविरूद्ध गुन्हा दाखल केला.

----------

कोतवालाला शिवीगाळ, दोघांविरूद्ध गुन्हा

धामणगाव रेल्वे : तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर येथे कोतवाल नितीन पडघान (२९) यांना शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. ३१ मे रोजी ही घटना घडली. याप्रकरणी ऋषी ठाकरे (मंगरूळ) व आकाश भेंड (धामणगाव) यांचेविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

-------------

हिराबंबई येथे महिलेला मारहाण

धारणी : तालुक्यातील हिराबंबई येथील एका ४५ वर्षीय महिलेला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी रायसिंग रावत, रघुनाथ रावत, सुंदर या तिघांविरूद्ध गुन्हा दाखल केला. आपसी वैमनस्यातून ही घटना घडली.

-------------

कु-हा देशमुख येथून रेतीचा टिप्पर जप्त

शिरजगाव कसबा : स्थानिक पोलीस ठाण्याअंतर्गत येणाºया कु-हा देशमुख बसस्टॅन्ड भागातून दीड ब्रास रेतीसह ८ लाखांचा टिप्पर व मोबाईल जप्त करण्यात आला. स्थानिक पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी आरोपी विजय भिंगारे (३४, थुगाव पिंपरी) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

-------------

सातेफळ कामनापूर मार्गावरून रेती जप्त

तळेगाव दशासर : सातेफळ ते कामनापूर मार्गावरून एमएच २७ एल २५४६ या क्रमांकाचा ट्रॅक्टर रेतीने भरलेल्या ट्रॉलीसह जप्त करण्यात आला. तळेगाव दशासर पोलिसांनी आरोपी संजय सावदे, संदीप मेटे (दोन्ही रा. सोनगाव) याच्याविरूद्ध गुन्हा नोंदविला.

-------------

अंगणवाडी सेविकांना मिळणार पदोन्नती

अमरावती : राज्यात कार्यरत एका लाखापेक्षा अंगणवाडी सेविकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर पदोन्नती देण्याबाबत विचार होत आहेत. त्यासाठी आवश्यक असलेल्या भरती नियमांची निर्मिती करण्याचे आदेशही विभागाला देण्यात आले आहेत. त्यामुळे पात्र अंगणवाडी सेविकांना बालविकास प्रकल्प अधिकारी या पदापर्यंत पदोन्नती मिळण्याची शक्यता निर्माण होणार आहे.

-----------------

मास्क न वापरणाऱ्यांकडून दंडाची वसुली

अमरावती : छत्री तलाव व लगतच्या परिसरात तोंडाला मास्क नसल्याने पाच जणांकडून प्रत्येकी ५०० रुपये प्रमाणे २५०० रुपये इतका दंड वसुल करण्यात आला. कोव्हीड-१९ बाबत जनजागृती करण्यात आली. सदर ठिकाणी पीएसआय कृष्णा मापारी, जेष्ठ स्वास्थ निरीक्षक कुंदन हडाले, स्वास्थ निरीक्षक, वसुली लिपिक, पोलीस कर्मचारी तसेच झोन क्र.३ चे कर्मचारी उपस्थित होते.

-----------

कोरोना लसीकरणाचा वेग मंदावला

धामणगाव रेल्वे: प्राथमिक उपकेंद्र अंतर्गत येणाºया चार ते पाच गावात ड्युटी करणे, यात लसीकरण, कोरोना चाचणी घेणे सोबतच गाव परिसरात आढळलेल्या कोरोना रुग्णावर लक्ष ठेवणे, उपकेंद्र अंतर्गत ग्रामस्थांना औषध उपचार करणे, प्रसूतीस आलेल्या महिलांची प्रसूती करणे यात दिवसभर काम केल्यानंतर रात्रीला उपकेंद्रात पुन्हा ड्युटी करणे अशी ४८ तासाची सेवा बजावली जात आहे.

----------

येरड ते चांदूरखेडा, सुलतानपुर रस्त्याची दुर्दशा

चांदूर रेल्वे : तालुक्यातील येरड ते चांदूरखेडा या नागपूर - औरंगाबाद सुपर एक्सप्रेस हायवेपर्यंत दोन किलोमीटर व येरड ते सुलतानपूर या ४ किमी रस्त्याची मोठी दुर्दशा झाली आहे. या दोन्ही रस्त्याचे डांबरीकरण उखडून रस्त्याची गिट्टी बाहेर निघाली आहे. रस्त्यावर जागो जागी खड्डे पडलेले दिसत आहे. परिमाणी, वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते.

---------------

पिक विम्याची रक्कम केव्हा?

कुºहा : सन २०२०-२१ या वर्षाचा पिकविमा अद्याप पर्यंत मिळाला नाही. गेल्या वर्षी शेतकºयांनी सोयाबीन, कपाशी, संत्रा या पिकांचा विमा काढला. परंतु दुसरे वर्षे सुरु झाले असून आजपर्यंत पिकविमा शेतकºयांना मिळाला नाही. तेव्हा राज्य शासनाने त्वरीत सन २०२०-२१ सालाचा पिकविमा शेतकºयांच्या खात्यात जमा करण्याची शेतकरी वर्गाची मागणी आहे.

---------

आंबिया बहाराला वादळाचा फटका

मोर्शी : मोर्शी व वरुड तालुक्यातील शेतकºयांच्या बागेतील आंबिया बहाराला गळती लागली असताना संत्रा झाडांची पाने पिवळी पडून गळत आहे. तालुक्यातील घोडदेव, पाळा, सालबर्डी, डोंगर यावली, दापोरी, मायवाडी, हिवरखेड, भाईपुर, बेलोणा, अंबाडा या भागातील संत्रा बागांमधील आंबिया बहाराला मोठ्या प्रमाणात फटका बसला.

--------------

नागरिक बिनधास्तच, कारवाई हवी

धामणगाव रेल्वे : तालुक्यातील ५५ गावात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत असतांना शहरात ही आकडेवारी कमी होत नाही. दिवसा उन्हातही नागरिकांची प्रचंड गर्दी रस्त्यावर पहायला मिळत असल्याने जमावबंदीचा फज्जा उडाला आहे. प्रशासनाचा कोणताही वचक नसल्याने नागरिक सैराट फिरत असल्याचे चित्र धामणगाव शहराचे आहे.

----------