शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

सारांश बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2021 4:10 AM

धामणगाव रेल्वे : तालुक्यातील वरूड बगाजी रोडवरून अवैध रेतीची वाहतूक करताना एमएच २७ एक्स ७३२१ या क्रमांकाचा ट्रक जप्त ...

धामणगाव रेल्वे : तालुक्यातील वरूड बगाजी रोडवरून अवैध रेतीची वाहतूक करताना एमएच २७ एक्स ७३२१ या क्रमांकाचा ट्रक जप्त करण्यात आला. २ जून रोजी पहाटे ही कारवाई करण्यात आली. मंगरू ळ दस्तगीर पोलिसांनी आरोपी बादल खडसे (३०, जुना धामणगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

--------------

दुचाकीच्या धडकेत तरुणी गंभीर

चांदूर रेल्वे : भरधाव दुचाकीच्या धडकेत भाग्यश्री ज्ञानेश्वर ढोक (२३) ही गंभीर जखमी झाली. ३० मे रोजी ११.३० च्या सुमारास हा अपघात घडला. चांदूर रेल्वे पोलिसांनी एमएच २७ एम ६०७८ क्रमांकाच्या दुचाकीचा चालक अंकुश चौधरी (दिघी कोल्हे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

------------

अल्पवयीन मुलीचा लेैंगिक छळ

बेनोडा : वरूड तालुक्यातील १७ वर्षीय मुलीचा पाठलाग करून तिचा लेैंगिक छळ करण्यात आला. तिच्यासोबत बळजबरीने काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. १३ जानेवारी ते २६ मेदरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी बेनोडा पोलिसांनी आरोपी गजानन घोरमाडे (३८, मांगरुळी पेठ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

------------

लेहगाव नर्सरीजवळ दुचाकीला अपघात

मोर्शी : तालुक्यातील लेहगाव येथे एका दुचाकीस्वाराला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात उमेश खुरसुडे हे जखमी झाले. १ जुन रोजी रात्री ११.३० च्या सुमारास हा अपघात घडला. जखमीचा भाचा अक्षय बाखडे याच्या तक्रारीवरून शिरखेड पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला.

-------------

चिखलसावंगीतून ३९ हजार रुपये पळविले

मोर्शी : तालुक्यातील चिखलसावंगी येथील चरणदास कळसकर यांच्या घरातून ३९ हजार रुपये रोख लंपास करण्यात आले. १ जून रोजी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी मोर्शी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.

-------------

अपघातप्रकरणी मालवाहू वाहनचालकाविरुद्ध गुन्हा

वरूड : येथील पेट्रोल पंपाजवळ १ जून रोजी रात्री ९.३० च्या सुमारास मालवाहू वाहनाने दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला होता. या अपघातप्रकरणी २ जून रोजी रात्री एमएच ४९ एटी ४१८० क्रमांकाच्या मालवाहू वाहनाच्या चालकाविरुद्ध कलम २७९, ३३८, ३०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

-----------

साईसृष्टी कॉलनीत चोरी, गुन्हा दाखल

वरूड : येथील अक्षय मगर्दे यांच्या घरातून सुमारे ६८ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला. १ जूनच्या रात्री ही घटना घडली. चोराने दाराचा कुलूपकोंडा तोडून घरातून डोरले, टीव्ही, मोबाईल लांबविला. याप्रकरणी वरूड पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.

------------

लाखनवाडी येथील विवाहितेचा छळ

चांदूर बाजार : तालुक्यातील लाखनवाडी येथील एका २३ वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. २३ सप्टेंबर २०२० च्या आसपास हा प्रकार घडला. याप्रकरणी शिरजगाव कसबा पोलिसांनी आरोपी निखील इंगळे, तेजस इंगळे व एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला.

--------------

विवाहितेचा पाठलाग करून विनयभंग

चांदूर बाजार : तालुक्यातील करजगाव येथील एका विवाहितेचा पाठलाग करून विनयभंग करण्यात आला. मोबाईलवर वारंवार संपर्क साधल्यामुळे पीडिताच्या मनात लज्जा निर्माण झाली. शिरजगाव कसबा पोलिसांनी आरोपी पंकज बारस्कर (रा. बासनेर, जि. बैतुल) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

-------------

जैनपूर येथे इसमाला मारहाण

चांदूर बाजार : दारू पिण्यास पैसे न दिल्याने बाबाराव दादाराव वानखडे (४८, रा. जैनपूर) यांना मारहाण करण्यात आली. २ जून रोजी दुपारी ही घटना घडली. चांदूर बाजार पोलिसांनी प्रेमदास वानखडे (४२, जैनपूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

--------------

चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर

परतवाडा : चांदूरबाजार ते अचलपूर मार्गावरील कविठा फाट्यानजीक चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार हिंमतराव आठवले (६५, जवळा शहापूर) हे गंभीर जखमी झाले. १० मे रोजी सकाळी हा अपघात घडला. परतवाडा पोलिसांनी याप्रकरणी २ जून रोजी एमएच २७ बीझेड ०१०६ क्रमांकाच्या वाहनाच्या चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला.

----------

मालवाहू वाहनातून रेती जप्त

अचलपूर : हनवतपुरा मार्गावरून एमएच २५ ए १८३१ क्रमांकाच्या वाहनातून एक ब्रास रेती जप्त करण्यात आली. २ जून रोजी ही घटना घडली. अचलपूर पोलिसांनी ते वाहन जप्त केले व वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

--------------

फोटो पी ०४ अंजनगाव

अंजनगावात भाजपचे आक्रोश आंदोलन

अंजनगाव सुर्जी : संपूर्ण ओबीसी समाजाला हक्काचे आरक्षण परत मिळवून देण्यासाठी अंजनगाव सुर्जी तालुका भारतीय जनता पार्टी ग्रामीण व शहर मंडल यांच्यावतीने नुकतेच जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. तहसीलदार जगताप यांना निवेदन देण्यात आले. यावेळी माजी आ. रमेश बुंदीले, नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे, ज्ञानेश्वर दाळू, केशव कळमकर, संतोष काळे, भास्कर माकोडे, संदीप राठी, राजेंद्र रेखाते, मनोहर मुरकुटे, नंदू चिंचोळकर, मनोहर भावे, अविनाश पवार, प्रियंका मालठाणे, विद्या घडेकर, वर्षा बारबब्दे, संगीता उके, सत्यम पवार, अमोल काळे, वामन इंगळे, हर्षल पायघन, रितेश अवंडकर, नंदकिशोर बचे, सचिन जायदे उपस्थित होते.

----------------