अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील निमखेड बाजार शिवारात गावातील वसंत खंडेझोड (७४) यांची वाट अडवून शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. ७ जुन रोजी सकाळी ही घटना घडली. याप्रकरणी अंजनगाव पोलिसांनी आरोपी राजेश मुंदे (रा. निमखेड) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.
-------------
खरपी शिवारातून दुचाकी लंपास
शिरजगाव कसबा : स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खरपी शिवारातून एमएच २७ बीयू ९१९८ या क्रमांकाची दुचाकी चोरीला गेली. ३ जून रोजी ही घटना घडली. याप्रकरणी निखिल सुंदरकर (३०, खरपी) यांच्या तक्रारीवरून संशयित दत्तू धाळसे (रा. एमपी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
-----------------
कुऱ्हा येथे तरुणाला मारहाण
शिरजगाव कसबा : घराच्या जागेच्या हक्कावरून एकमेकांना मारहाण करण्यात आली. ७ जून रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी उमेश अंगारे (३३) यांच्या तक्रारीवरून सुरेश सवळे (५०) व एक महिला (दोन्ही रा. कुऱ्हा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. एका महिलेच्या तक्रारीवरून उमेश अंगारेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
------------------
जीवनपुरा येथे घरात शिरून मारहाण
अचलपूर : स्थानिक जीवनपुरा येथील नजीर शाह रहमान शाह (४२) यांना त्यांच्या घरात शिरून काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. ६ जून रोजी सायंकाळी हा प्रकार घडला. याप्रकरणी आरोपी मोहसीन अली अकबर अली, सज्जू अली, तौफीक अली, कय्यूम अली व अन्य एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
---------------
केशव नारायण मंदिर चौकात राडा
अचलपूर : जुनी भाड्याची रक्कम देत नसल्याच्या कारणावरून येथील केशवनारायण मंदिर चौकात मो. मोबीन मो. सलीम (२५, रा. सराईपुरा) याचसह त्याच्या कुटुंबीयांना लोखंडी पाईप, काठी व दगडाने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी जखमी मो. मोबीन याच्या तक्रारीवरून मो. फईम, मो. अलीम, मो. काशीर, मो. नदीम, मो. कलीम, मो. वसीम, मो. अदीब (सर्व रा. मोमिनपुरा) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. मो. काशीर मो. सलीम (२८, रा. सराईपुरा) यांच्या तक्रारीवरून इशाक मो. याकूब, शेख करीम, मो. सलीम, मो. सलमान, मो. मोबीन, मो. वसीम मो. सलीम, मो. रेहान, मो. नदीम (सर्व रा. सराईपूरा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
--------------
महिलेचा विनयभंग,
आसेगाव: स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील ३५ वर्षीय विवाहितेचा विनयभंग करण्यात आला. २८ मे रोजी सायंकाळी ही घटना घडली. याप्रकरणी आरोपी शिवचरण गवई व दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दोन महिलांनी पीडिताचे केस ओढून तिला मारहाण केली.
-----------------
अवैध रेती वाहतूक, ट्रॅक्टर ट्रॉली जप्त
माहुली : अमरावती तालुक्यातील ब्राम्हणवाडा भगत झोपडपट्टीजवळच्या शिराळा रोडवरून अवैध रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर ट्रॉलीसह जप्त करण्यात आला. ७ जून रोजी रात्री ९ च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. माहुली पोलिसांनी आरोपी शुभम निचित (ब्राम्हणवाडा भगत) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
-----------------
बांधकाम मजूर महिलेचा विनयभंग
धारणी : तालुक्यातील एका गावातील बांधकाम मजूर महिलेचा विनयभंग करण्यात आला. जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. ७ जून रोजी ही घटना घडली. धारणी पोलिसांनी याप्रकरणी नारायण भेंडेकर (रा. राणीगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
-------------------
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण
अमरावती : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्था आणि वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण करण्यात आले. नगरसेवक प्रशांत डवरे, व्यवस्थापन समिती सदस्य प्रफुल्ल गवई, अनिल घोम, वेक्सचे सचिव जयंत वडतकर, गजानन वाघ, काझी, विनोद बोरसे, वसंत हेलावी रेड्डी, वनस्पतिशास्त्र विभागाचे माळोदे, मंजूषा वाठ, विशाखा सावजी, कुमार कार्यक्रमास उपस्थित होते.
------------
फोटो पी १० पोरगव्ैहान
पोरगव्हाण येथे बार्टीमार्फत वृक्षरोपण
शिरखेड : बार्टी पुणे यांच्यावतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त धम्मज्योती गजभिये यांच्या हस्ते वृक्षारोपण पंधरवडा सप्ताहाचे उद्घाटन पार पडले. या अंतर्गत समतादूत विजय वानखेडे, राखी सोलव यांच्या हस्ते स्मशानभूमी रोडवर वृक्षरोपण करण्यात आले. सरपंच माया कोकणे, उपसरपंच .................... इब्ररीस पटेल, सचिव देशमुख, मयूर सोलव, निरंजन कोकणे, संजय पुंड उपस्थित होते.
--------------
काटपूर ममदापूर येथे बार्टीमार्फत ग्रामपंचायतीमध्ये वृक्षारोपण
अमरावती : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्यावतीने ५ जून रोजी काटपूर येथे वृक्षारोपण करण्यात आले. समतादूत प्रकल्प अधिकारी विजय वानखेडे, राखी सोलव, जिल्हा परिषद सदस्य शरद मोहोड, सरपंच आशा खताळे, उपसरपंच सरवटकर, ग्रामविकास अधिकारी फंडे व ग्रामस्थ उपस्थित होते.
-----