अमरावती : सोमवारपासून अनलॉक झाल्याने शहरातील बाजारपेठेत रौनक आली आहे. मान्सूनने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी शहरातील कृषिसेवा केंद्र गाठल्याने जुना कॉटन मार्केट परिसरात मोठी वर्दळ पाहावयास मिळत आहे. सोबतच खतांचीदेखील खरेदी सुरू आहे.
-----------------
गाडगेनगर बनले कचऱ्याचे आगर
अमरावती : स्थानिक गाडगेनगर स्थित गाडगेबाबा मंदिरासमोरील परिसरात जेथे महामंडळाच्या एसटी बस थांबतात, तेथे कचऱ्याचा मोठा डोंगर साचला आहे. प्रभागातील कचरा संकलित करून तेथे आणून टाकला जात असल्याने ते ठिकाण कचऱ्याचे आगर बनले आहे. संबंधित नगरसेवकाचे त्याकडे दुर्लक्ष आहे.
-----------------
किल्ल्यांचे पावित्र्य अबाधित ठेवून टप्प्याटप्प्याने संवर्धन
अमरावती: राज्यातील गडकिल्ल्यांचे पावित्र्य टिकवून त्यांचे टप्प्याटप्प्याने संवर्धन करण्यासाठी आता पावले टाकण्यात येत असून, राज्यातील दुर्गप्रेमी, दुर्ग संवर्धक, गिर्यारोहक यांनी यासंदर्भातील आपल्या सूचना व प्रस्ताव मुख्यमंत्री सचिवालयातील संकल्प कक्षास त्वरित पाठवाव्यात, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. त्या अनुषंगाने चिखलदरा येथील किल्ल्यांचे संवर्धन होण्याची अपेक्षा जिल्हावासीयांना आहे.
-----------------
राष्ट्रसंतांच्या महासमाधी स्थळावर नाना पटोले नतमस्तक
गुरुकुंज मोझरी : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी गुरुकुंज आश्रमात महासमाधी स्थळावर भेट देऊन महासमाधीचे दर्शन घेतले. यावेळी महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर तसेच जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-----------------
एकात्मिक ऊर्जा विकास योजनेतून ऊर्जा विकास
अमरावती : महावितरणच्या एकात्मिक ऊर्जा विकास योजनेंतर्गत अमरावती शहराला सुरळीत आणि दर्जेदार वीजपुरवठा मिळावा, यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांतर्गत ८४.७० कोटी रुपयांची कामे कार्यान्वित करण्यात आली आहेत. योजनेतून शहरातील वीज यंत्रणा सक्षमीकरण करताना वीज ग्राहकांना दर्जेदार वीजपुरवठा मिळण्यासाठी शंकरनगर आणि दसरा मैदान येथे १८.६६ कोटी रुपये खर्च करून ३३/११ केव्हीची दोन उपकेंद्रे उभारण्यात आली.
-----------------
नुटातर्फे दयासागर हॉस्पिटलमध्ये मॉनिटर, नेब्युलायझर भेट
अमरावती : नुटातर्फे स्थानिक दयासागर हॉस्पिटलला आयसीयूकरिता लागणारे मल्टिपॅरा मॉनिटर व दहा नेब्युलायझर मशीन भेट देण्यात आले. याप्रसंगी नुटाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण रघुवंशी, दयासागर हॉस्पिटलच्या प्रशासक डॉ. जिना, हॉस्पिटल अधीक्षक डॉ. रचिता, डॉ. लीसी, डॉ. काशीनाथ बऱ्हाटे, डॉ. दिलीप हांडे, डॉ. चांगोले, डॉ. सुभाष गावंडे, विलास ठाकरे, डॉ. रॉय, डॉ. गोविंद तिरमनवार, डॉ. रेवती खोकले, डॉ. क्षमा कुलकर्णी, डॉ. नितीन तट्टे , डॉ. उकेश, डॉ. वसुले, डॉ. महेंद्र मेटे उपस्थित होते.