तिवसा : येथील एका २७ वर्षीय विवाहितेचा विनयभंग करण्यात आला. २० जून रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास ही घटना घडली. तिवसा पोलिसांनी याप्रकरणी आरोपी विजय जानराव नेमाडे (३२, तिवसा) याचेविरूद्ध गुन्हा दाखल केला.
-----------------
चांदूरबाजारच्या ग्रामीण रुग्णालयातून दुचाकी लंपास
चांदूरबाजार : येथील ग्रामीण रुग्णालय परिसरातून एमएच २७ सीडी ४९७८ या क्रमांकाची दुचाकी लांबविण्यात आली. २२ मे रोजी ही घटना घडली होती. याप्रकरणी चांदूरबाजार पोलिसांनी आनंद जुनारे यांच्या तक्रारीवरून २१ जून रोजी अज्ञाताविरूद्ध गुन्हा नोंदविला.
----------------
सावलीखेडा येथे मारहाण
धारणी : तालुक्यातील सावलीखेडा येथील हिरालाल मावस्कर यांना घराच्या जागेवरून काठीने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी धारणी पोलिसांनी आरोपी शंकर मावस्कर व एका महिलेविरूद्ध गुन्हा दाखल केला.
------------
धारणी तालुक्यात भावंडांना मारहाण
धारणी : तालुक्यातील चुटीया येथे नारायण गायन (४५) व त्यांच्या भावाला शेतीच्या वादातून मारहाण करण्यात आली. याप्रकरणी धारणी पोलिसांनी आरोपी श्रावण तुकाराम गायन, गोपाल तुकाराम गायन, लाचू (सर्व रा. चुटीया) यांचेविरूद्ध गुन्हा दाखल केला.
------------
गजीपुरात महिलेसह मुलाला मारहाण
दर्यापूर : तालुक्यातील खुर्चनपूर येथील एका ६० वर्षीय महिलेच्या हातावर चाकू मारल्याची घटना घडली. तसेच मुलाला देखील लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात आली. दर्यापूर पोलिसांनी आरोपी ज्ञानेश्वर चापके (४०, येवदा) याचेविरूद्ध गुन्हा दाखल केला.
--------------
येवद्याच्या जिल्हा परिषद शाळेत चोरी
येवदा : येथील जिल्हा परिषद कन्या शाळेतील ७०० रुपये किमतीचा गंज चोरीला गेला. १८ जून रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास हा प्रकार उघड झाला. मुख्याध्यापक संदीप बेराड (४९) यांच्या तक्रारीवरून आरोपी अजय विजय मोहोड (२७, येवदा) याचेविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
--------------
कु-ह्याच्या रस्त्यावरील पथदिवे बंद
कु-हा : येथील पथदिव्यांचा विद्यत पुरवठा खंडित करण्यात आल्याने गाव व परिसरात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे अनुसूचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रा.पं. ने व गावकऱ्यांनी संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात आला. तेव्हा संबंधित विभागाने त्वरित दखल घेऊन विद्युत पुरवठा सुरू करण्याची मागणी कु-हा परिसरातील जनता करीत आहे.
--------------
जालनापूर येथे एक कुटुंब एक जीवन ड्रॉपचे वाटप
जालनापूर : नाशिक येथील धनदीप संस्थेच्यावतीने १०० कुटुंबीयांना जालनापूर येथील ग्रामपंचायत सरपंच नीळकंठ चव्हाण यांच्या हस्ते जीवन ड्रॉप वाटप करण्यात आले. गोर गरिबांना कपडे वाटप, ताडपत्री वाटप, वृक्षारोपण कार्यक्रम असे बरेच उपक्रम राबवीत असून गरजू लोकांना वस्तू स्वरूपात मदत सुद्धा केली जाते.
--------------
शेषराव राऊत
कु-हा : जि.प. सेवानिवृत्त मुख्याध्यापक शेषराव रामराव राऊत (८६, घोटा) यांचे २० जून रोजी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन मुली, स्नुषा, जावई, नातू, नातवंड असा बराच मोठा राऊत परिवार आहे.
--------------
पवनी मध्यम प्रकल्पाच्या कामाचा भूमिपूजन
वरूड : आ. देवेंद्र भुयार यांच्या प्रयत्नामुळे २ कोटी २० लक्ष रुपयांच्या पवनी मध्यम प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळाली. कामाचे भूमिपूजन आमदार देवेंद्र भुयार, खासदार रामदास तडस यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. वरूड मोर्शी तालुक्यातील पाण्याची पातळी वाढवून वरूड मोर्शी तालुका ड्राय झोनमुक्तीसाठी मतदारसंघातील अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्णत्वास नेण्यात येत आहेत.