शिंदी येथे आंबेडकर जयंती
शिंदी बु : येथील मिलिंद विद्यार्थी मंडळद्वारे भारतरत्त्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. ग्रामपंचायत सदस्य रत्ना इंगोले यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. उपसरपंच मो. शहजाद यांच्या हस्ते हारार्पण करण्यात आले. यावेळी सत्यवान चव्हाण, मधु इंगळे, संजय वाठ, पंकज मालधुरे, देवू गजभिये, विजय बोरकर उपस्थित होते.
----------
अंजनगाव तालुक्यात अँटिजन टेस्ट
अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील सातेगाव, कापूसतळणी भंडारज, कोकर्डा येथील नागरिकांची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात येत आहेत. १४ एप्रिल रोजी स्थानिक पंचायत समितीच्या प्रांगणात अनेकांची अँटिजेन चाचणी करण्यात आली. तालुका आरोग्य अधिकारी सुधीर डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही शिबिरे घेतली जात आहेत.
------------
डॉ. हेडगेवार हॉस्पिटलला एक लाखाची देणगी
अमरावती : परकोटाच्या आतील अतिशय पुरातन, ऐतिहासिक अशा श्री गणेश मंदिराच्या पवित्र मूर्तीच्या पुढ्यात जहागीरदार वाड्याचे पद्माकर आणि मालती जहागीरदार यांनी जनकल्याण सेवा संस्था संचालित डॉ. हेडगेवार हॉस्पिटलच्या आयसीयूसाठी एक लाख रुपयांची भरीव देणगी प्रदान केली. अजय श्रॉफ आणि सचिव गोविंद जोग यांनी या धनादेशाचा स्वीकार केला.
-------
आज स्वरांजलीतून बाबासाहेबांना अभिवादन
अमरावती: विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून सिंफनी स्टुडिओ आणि सिंफनी ग्रुप ऑफ म्युझिक कल्चरल अँड वेलफअर ट्रस्ट ‘स्वरांजली’ सादर करणार आहेत. सिंफनी ट्यून्स या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबूक लाईव्हवर हा कार्यक्रम १८ एप्रिल रोजी रात्री ८.३० वाजता सर्वांना मोफत बघता येईल.
-----------
फोटो पी १७ दर्यापूर रक्तदान
तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने रक्तदान
दर्यापूर : तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने १७ एप्रिल रोजी अध्यक्ष सुधाकर भारसाकळे यांच्या नेतृत्वाखाली रक्तदान शिबिर घेण्यात आले. यात १०१ लोकांनी रक्तदान केले. शिबिराला जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख, आमदार बळवंत वानखडे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सभापती बाळासाहेब हिंगणीकर उपस्थित होते. यावेळी ईश्वर बुंदिले, सुनील गावंडे, अभिजित देवके, गजानन जाधव, दीक्षांत पाटील, अमोल जाधव, प्रदीप देशमुख, संजय देशमुख, प्रभाकर तराळ, अविनाश ठाकरे, बबनराव देशमुख, सुधीर पवार, विनोद पवार, संदीप गावंडे, शिवाजी देशमुख, पप्पू होले उपस्थित होते.
----------
तालुक्यातील शाळांना प्रिंटरचे वितरण
धामणगाव रेल्वे : तालुक्यातील विविध शाळांना माजी मंत्री रणजित पाटील यांच्या आमदार विकासनिधीमधून लेझर प्रिंटर्सचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी से.फ.ला. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य गणेश चांडक अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी पद्माकर घोगरे, श्रीरंग माथुरकर, गोपाल मुंधडा हे उपस्थित होते. संचालन व आभार प्रदर्शन विनायक कडू यांनी केले.
-----------
फोटो पी १७ नांदगाव
नियमाचे उल्लंघन करणाऱ्या १३ जणांविरुद्ध कारवाई
नांदगाव खंडेश्वर : शनिवारी दुपारी महसूल, पोलीस व नगर पंचायत विभागाचे संयुक्त पथक रस्त्यावर उतरले. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या १३ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यावेळी तहसीलदार किशोर यादव, मुख्याधिकारी मीनाक्षी यादव, ठाणेदार हेमंत ठाकरे, पीएसआय प्रदीप कांबळे, पोलीस कर्मचारी नरेंद्र काटे, सुषमा नागदेवते, गोपाळ शेंडे, राजेश सरकाटे, नगरपंचायतचे अभिजित लोखंडे, संजय चौधरकर, मो. रहील, नेमिनाथ सानप, गजानन चांदणे यांचा समावेश होता.
---------