पथ्रोट येथे दुसऱ्या डोसच्या लसीकरणाला नागरिकांची गर्दी
पथ्रोट : येथील जयसिंग विद्यालयामध्ये लसीकरणाच्या दुसऱ्या डोसला पथ्रोट व परिसरातील नागरिकांनी पहाटे ५ वाजतापासून रांगा लावल्या. पहिल्या डोज घेऊन ज्यांना ४५ दिवस झाले, त्या २०० नागरिकांना लस देण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी अभिजित काळे यांनी दिली. नियोजनासाठी एम. डी. ढोले, जी. एच. बुरके, आरोग्य सेविका पडोळे, जावरकर, बदकले, आरोग्य सहायक निलेश दुर्गडे, जयसिंग विद्यालयाचे प्राचार्य मोहर,े शिक्षक राम चौधरी तैनात होते.
--------
रेशनमधून मक्याऐवजी गहू, तांदळाची मागणी
मोर्शी : शासकीय स्वस्त धान्य दुकानातून मकाऐवजी गहू किंवा तांदूळ वितरित करण्यात यावे, असे निवेदन आपलं गाव युवा संघटनेच्या वतीने नायब तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी नरेंद्र सोनागते, पाळा येथील सरपंच अजय राऊत, बाजार समितीचे संचालक बंडू जिचकार, खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष मोरेश्वर गुडदे, विलास राऊत, राजेश घोडकी, राजू बिसाद्रे, तालीब खान, पद्माकर गजरे, दीपक लाडुकर उपस्थित होते.
---
अमरावती महानगरपालिकेकडून लसीकरणाबाबत हेल्पलाईन
अमरावती : शहरात कोविड लसीकरणाबाबत माहिती ८४०८८१६१६६ या कोरोना हेल्पलाईन क्रमांकावर कळू शकेल. अमरावतीकर नागरिकांनी माहिती मिळवण्यासाठी सकाळी १० ते संध्याकाळी ७ या वेळेत या क्रमांकावर फोन करावा. लसीकरणाची माहिती मिळवण्यासाठी याच हेल्पलाईनचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
-----
उन्हापासून बचावासाठी दवाखाना परिसरात नेट
अमरावती: जवाहर गेट - बुधवारा प्रभागाचे नगरसेवक विवेक कलोती यांनी सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला. भाजीबाजार येथील दवाखान्यात शेकडो लोक लस घेण्यासाठी येतात आणि उन्हात उभे राहतात, त्यांना होणारा त्रास याची जाणीव ठेवून उन्हापासून त्यांचा बचाव करण्याकरिता दवाखाना परिसरात ग्रीन नेट बांधण्यात आली.
-------------
चंद्र्रकात पाटील यांच्यावर गुन्हा नोदवा
वनोजा बाग : राज्याचे अन्न व नागरिक पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहिरपणे धमकावल्याचा आरोप करीत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने पाटील यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करा, अशी माागणी करण्यात आली. यावेळी विपुल नाथे, कुमार बोबडे, प्रविण काळे, बंडू नाथे, अतुल हाडोळे, शिवदास येवले, गणेश शेगोकर, धीरज काळे, परमेश्वर श्रीवास्तव, अतुल वºहेकर उपस्थित होते.
----------------