पाईपलाईनच्या खोदकामामुळे शेतीचे नुकसान
चांदूर रेल्वे : तालुक्यातील राजुरा येथील कॅनल पाईप लाईनच्या खोदकामामुळे शेतीचे नुकसान झाल्याची तक्रार एका शेतकऱ्याने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. राजुरा येथील रहिवासी राजेंद्र मधुकरराव सोळंके यांचे शेतातून सात मीटरची पाईपलाईन कॅनल जात आहे. कोणत्याही प्रकारची नोटीस न देता त्यांच्या शेतात खोदकाम केले आहे.
---------
कापसाच्या गंजीमुळे खाजेची लागण
वरूड : कापूस निघून आता सहा महिने झाले. दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे व कापसामध्ये मॉइश्च्युरायझर कमी होऊन वजनात घट होते. आता मात्र कापसाची गंजी लावून जास्त दिवस झाल्याने कुटुंबातील सदस्यांना खाजेची लागण झाली आहे.
-----------
शिरजगावातील पशुवैद्यकीय दवाखाना डॉक्टरांविना
शिरजगाव कसबा : चांदूर बाजार तालुक्यातील सर्वाधिक मोठ्या लोकसंख्येच्या शिरजगावात जिल्हा परिषद व पंचायत समिती लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्यामुळे या भागात पशुधनाच्या मृत्यूची मालिका सुरूच आहे. गावातील प्रथम श्रेणी पशू दवाखान्यात अनेक वर्षांपासून पशुवैद्यकीय डॉक्टर नाही.
------------
चारित्र्यावर संशय घेऊन छळ
मोर्शी : चारित्र्यावर संशय घेऊन व माहेरहून २ लाख रुपये आणण्याचा तगादा लावत सासरच्या मंडळीने आपला शारीरिक व मानसिक छळ चालविल्याची तक्रार एका ३५ वर्षीय विवाहितेने शिरखेड पोलिसांत नोंदविली आहे. याप्रकरणी हनुमंत कायवाटे, सुभाष कायवाटे, अमोल कायवाटे, दिनेश कायवाटे व दोन महिला (सर्व रा. शिवदासनगर, अकोट) यांचेविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
--------------
तालुक्यात अवैध धंदे जोरात
ब्राम्हणवाडा थडी : शिरजगाव, करजगाव तसेच ब्राम्हणवाडा थडी या गावात अवैध व्यावसायिक बिनधास्त व्यवसाय करताना दिसत आहे. प्रशासनाचा धाक, अधिकाऱ्याचा दरारा कुठेच निदर्शनास येत नाही. जोमात गावठी दारू, अवैध देशी, सागवान तस्करी, वाळू तस्करी, गुटखा विक्री जोमात आहे.
-------------
मोबाईल अतिवापर डोळ्यासाठी घातक
येवदा : मोबाईलच्या अतिवापरामुळे किरणोत्सारामुळे दृष्टी आजाराने ग्रासले आहे. शिक्षण विभागाने ऑनलाईन शिक्षण बंद करावे आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून शाळेतच एक दोन मीटरच्या अंतराने विद्यार्थ्यांना बसवून फळ्यावरचे शिक्षण सुरू करून विद्यार्थ्यांना दृष्टी दोषापासून मुक्ती द्यावी, अशी मागणी पालकांनी व्यक्त केली आहे.
------------
खाद्यतेलाने बिघडविले बजेट
भातकुली : खाद्य तेलाच्या दरवाढीमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. यामुळे स्वयंपाक घरातील तेलाचा वापर कमी करावा लागत आहे. चपाती बिनातेलाची, तर भाजीतही अत्यंत कमी प्रमाणात तेल टाकावे लागत आहे. त्यामुळे जेवणाची चव सुद्धा खालावली आहे. तेलाचे भाव प्रचंड वाढल्याने फोडणीकरिता सुद्धा कमी तेल वापरण्याची वेळ गृहिणीवर आली आहे.
-----------
सिंभोऱ्यातील अवैध दारू बंद करण्याची मागणी
मोर्शी : अप्पर वर्धा धरणामुळे जागतिक पातळीवर आलेल्या सिंभोरा येथे रस्त्यावरच विविध प्रकारची दुकाने थाटली गेली. या मार्गावरून शाळकरी विद्यार्थी विद्यार्थिनी शहरात उच्च शिक्षण घेण्यासाठी जाणे-येणे करतात. या गावातील काही नागरिक अवैध देशी दारूच्या पेट्या आणून दारूची विक्री करीत आहे. ती अवैध दारूविक्री बंद करण्याची मागणी महिलांनी केली आहे.
--------------------
रक्तदानासाठी लायन्स क्लबचा चौथ्यांदा पुढाकार
धामणगाव रेल्वे : राज्यात दुसऱ्या कोरोना लाटेचा वाढता प्रादुर्भाव त्यात ऑक्सिजन व रक्ताची जाणवत असलेली कमतरता पाहता लायन्स क्लबने दोन महिन्यांत तब्बल चार वेळा रक्तदान शिबिर घेत असून, रविवारी महावीर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
-----
अंजनगाव वनविभागात आरएफओच नाही
अंजनगाव सुर्जी : स्थानिक वनपरिक्षेत्रातील आरएफओचे पद पाच महिन्यांपासून रिक्त आहे. तेथे नियमित आरएफओच नाहीत. मेळघाट प्रादेशिक वनविभागांतर्गत येत असलेल्या या अंजनगाव वनपरिक्षेत्राचा अतिरिक्त प्रभार अमरावती प्रादेशिक वनविभागातील परतवाडा येथील आरएफओंकडे देण्यात आला आहे.
-------------