अमरावती : बालाजी ब्लड बँक अंबापेठ येथे ऑक्सिजन फॉऊंडेशन अमरावतीच्यावतीने प्लाझ्मा व रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी महापौर चेतन गावंडे व सिटी कोतवालीचे पोलीस निरीक्षक राहुल आठवलेसुद्धा उपस्थित होते.
-------
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दिन समारंभ साधेपणाने
अमरावती : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठीच्या तरतुदी विचारात घेऊन राज्यात यंदा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६१ वा वर्धापन दिन समारंभ गतवर्षीप्रमाणेच अत्यंत साधेपणाने आयोजित करण्यात येणार आहे. सर्वांसाठी मास्क बंधनकारक राहील, याची दक्षता घेण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
---------
अस्मा फिरोज खान झोन ३ च्या सभापती
अमरावती : पूर्व झोन क्र. ३ दस्तुरनगर प्रभाग समितीच्या सभापती अस्मा फिरोज खान यांनी २९ एप्रिल रोजी पदभार स्वीकारला. सदर पदग्रहण समारंभाकरिता विरोधी पक्षनेता बबलू शेखावत, नगरसेवक ऋषी खत्री, सहायक आयुक्त नंदकिशोर तिखिले, नरेंद्र देवरनकर उपस्थित होते.
------------
आमदारांकडून रुग्णांची विचारणा, भेट
वरूड : आमदार देवेंद्र भुयार यांनी अमरावती येथील सुपर स्पेशालिटी कोविड रुग्णालयाला भेट देत वरूड, मोर्शी तालुक्यातील रुग्णांच्या भेटी घेऊन आस्थेने विचारपूस करताना रुग्णालयाला आवश्यक कर्मचारी उपलब्ध करून द्यावे, पुरेसा औषधसाठा उपलब्ध करून द्यावा, रुग्ण व नातेवाइकांची गैरसोय टाळा आदी सूचना वैद्यकीय विभागाला दिल्या.
-----------
मारहाण प्रकरणातील आरोपीची जामिनावर सुटका
चांदूर रेल्वे : येथील एका मारहाण प्रकरणातील आरोपी बादल केशरवानी याची एक दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर गुरुवारी पुन्हा चांदूर रेल्वे येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर करून सुटका केली. १४ फेब्रुवारी रोजी तक्रारदार नागसेन खोब्रागडे यांनी तक्रार नोंदविली होती.
----------------
रस्त्याच्या कामाची खानापूर ग्रामपंचायतची मागणी
नांदगाव खंडेश्वर : खानापूर ते हरणी पांदण रस्ता, गोळेगाव ते सालोड रस्त्याचे डांबरीकरण, खानापूर ते कोहळा रस्त्याचे खडीकरण करून डांबरीकरण करावे, अशी मागणी सरपंच शीला बसवनाथे, उपसरपंच गजानन पवार, सदस्य मनोहर बगळे, शोभा करपते, बेबी कांबळे यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे.
-------------
यशोदानगर चौकात ३० जणांची कोरोना चाचणी
अमरावती: गुरूवारी यशोदानगर चौक येथे शहरात अकारण फिरणाºया ३० जणांची कोविड तपासणी करण्यात आली. सहाय्यक आयुक्त भाग्यश्री बोरेकर व प्राची कचरे यांनी भेट दिली. सदर ठिकाणी ५ नागरिकांच्या तोंडाला मास्क नसल्याने प्रत्येकी ५००
रुपयांप्रमाणे २५०० रुपये दंड वसुल करण्यात आला.
-------------
अधिक कर्मचारी, बँकेला दंड
अमरावती : झोन क्रमांक ३ मध्ये एका खासगी बँकेत १५ टक्यांपेक्षा जास्त कर्मचारी आढळल्याने त्यांचेकडून एकुण १० हजार रुपये दंड व मास्क न लावणा-या सहा कर्मचाºयांकडून प्रत्येकी ५०० रुपये प्रमाणे ३००० रुपये दंड वसूल करण्यात आला. सहायक आयुक्तांच्या नेतृत्वातील पथकाने बुधवारी ही कारवाई केली.
--------