शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
2
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
3
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
4
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
5
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
6
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
7
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
8
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
9
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
10
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
11
‘जात’ जाते कधी, येते कधी?; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवे आकलन देणारा ठरलाय
12
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...
13
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
14
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
15
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
16
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
17
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
18
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
19
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
20
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान

सारांश न्यूज इनबॉक्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 4:29 AM

भातकुलीत रायुकाँचा ऑनलाईन रोजगार मेळावा भातकुली : खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने भातकुली येथे ऑनलाईन ...

भातकुलीत रायुकाँचा ऑनलाईन रोजगार मेळावा

भातकुली : खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने भातकुली येथे ऑनलाईन रोजगार मेळावा घेण्यात आला. मेळाव्यात अनेक तरुणांनी ऑनलाईन रोजगार नोंदणी केली. मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष सुशील गावंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष मेघश्याम घोंगडे, अमोल भारसाकळे आदी उपस्थित होते.

--------

पेढी नदीवरील पूल शिकस्त

भातकुली : तालुक्यातील कुंड खुर्द व कुंड सर्जापूर या दोन जुळ्या गावांना जोडणारा पेढी नदीवरील पूल अत्यंत शिकस्त झाला आहे. पुलाच्या दोन्ही कडावरील लोखंडी अँगल पूर्णपणे गायब झाले असून, या पुलावर रात्रीच्या वेळी मोठा अपघात संभवतो. या पुलाच्या दोन्ही कडांना लोखंडी अँगल लावण्यात यावेत, अशी दोन्ही गावांच्या ग्रामस्थांची मागणी आहे.

------------

गावागावांत ग्रामपंचायत निवडणुकीचा ज्वर

येवदा : जिल्हयातील ग्रामपंचायतींची निवडणूक पुढील महिन्यात होऊ घातली आहे. या पार्श्वभूमीवर गावागावांत बैठकांना जोर आला आहे. पॅनलप्रमुखांच्या घरी सदस्य निवडीसाठीचे खलबते सुरू झाली आहेत. ही निवडणूक राजकीय पक्षांच्या बॅनरखाली लढविली जात नसली तरी पॅनलप्रमुख वा सदस्य, सरपंच होऊ इच्छिणारे कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षांशी संबंधित असतात.

--------------

खारतळेगाव-अळणगाव रस्त्याची दुरवस्था

भातकुली : तालुक्यातील अळणगाव ते खारतळेगाव या सहा किमी अंतराच्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. अळणगाव हे गाव निम्न पेढी प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात असल्याने या रस्त्याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नसल्याची वस्तुस्थिती आहे. दिवंगत संजय बंड हे वलगाव विधानसभेचे प्रतिनिधित्व करीत असताना या रस्त्याची निर्मिती झाली होती. विद्यमान लोकप्रतिनिधींचे त्याकडे दुर्लक्ष आहे.

-----------------

विभागीय क्रीडा संकुल मार्गावर हवे गतिरोधक

अमरावती : पंचवटी ते इर्विन या महामार्गादरम्यान विभागीय क्रीडा संकुलाजवळच्या रस्त्यावर गतिरोधक असणे अत्यंत निकडीचे झाले आहे. पंचवटीकडून वा उड्डाणपुलाहून इर्विनकडे जाणारी वाहने अत्यंत वेगाने पुढे जातात. शिवाजी सायन्स कॉलेजसमोर महामार्गाच्या दुभाजकाला वळसा घेत अनेक वाहने क्रीडा संकुलात येतात. येथे अनेक छोटे-मोठे अपघातही घडले आहेत.

-----------------

रेल्वे स्टेशन ते इर्विन मार्ग अतिक्रमणयुक्त

अमरावती : रेल्वे स्थानकाकडून इर्विनकडे येणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण थाटण्यात आले आहे. या मार्गावरील अनेक दुकानांनी सिंमेट रोड कह्यात घेतला असून अर्धेअधिक रस्त्यावर गॅरेजमधील वाहने उभी केलेली असतात. या मार्गावरील पदपथ अनेक छोट्या-मोठ्या व्यवसायिकांनी गिळंकृत केला आहे. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने त्याकडे दुर्लक्ष चालविले आहे.

---------------

कापूस गेला, तुरीवर मदार

ब्राम्हणवाडा थडी : कापसावर बोंडअळी व बोंडसडने आक्रमण केल्याने उत्पादन घटले आहे. सोयाबीनने आधीच शेतकऱ्यांना दाखविला होता. त्यामुळे आता शेतकऱ्यांची संपूर्ण मदार तुरीवर आहे. तुरीचे उत्पादन बरे झाल्यास खरिपासाठी घेतलेले उधारी तरी फेडता येईल, असा शेतकऱ्यांचा होरा आहे.

-----------

दत्तापुरातील तरुणाची ऑनलाईन फसवणूक

धामणगाव रेल्वे : दत्तापूर येथील अंकुश जुमडे (२८, रा. एकवीरानगर) याची ३७ हजार ५०० रुपयांनी ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. क्रेडिट कार्ड रिवाॅर्ड पॉईंट कॅश कन्व्हर्टकरिता अंकुुशला ओेटीपी मागण्यात आला. तो देताच त्याच्या खात्यातील रक्कम दिल्ली येथील एका बँक खात्यात ट्रान्सफर झाली. २६ नोव्हेंबर रोजी दुपारी ही घटना घडली. दत्तापूर पोलिसांनी अनोळखी मोबाईलधारकाविरुद्ध गुन्हा नोंदविला.

------------

प्रवासादरम्यान सोन्याची पोत लंपास

तिवसा : तालुक्यातील वऱ्हा येथील नंदकिशोर मलवार यांच्या बॅगेतून प्रवासादरम्यान १ लाख १ हजार ६१ रुपये किमतीची सोन्याची पोत लंपास करण्यात आली. ११ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० ते १.३० च्या सुमारास नेर तालुक्यातील मोझर ते वऱ्हा गावादरम्यान हा प्रकार घडला. कुऱ्हा पोलिसांनी १२ डिसेंबर रोजी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला.

--------------------

अपघातात तरुण जखमी

धारणी : ११ डिसेंबर रोजी येथे झालेल्या अपघातात मो. असलम अ. हमीद (३६, रा. हरिसाल) हा तरुण जखमी झाला. अज्ञात वाहनचालकाने त्यास धडक दिली. याप्रकरणी धारणी पोलिसांनी १२ डिसेंबर रोजी दुपारी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला.

------------

चिमुकलीच्या अपघातप्रकरणी कारचालकाविरुद्ध गुन्हा

अंजनगाव सुर्जी : येथील काठीपुरा भागातील एका दवाखान्याजवळ १२ डिसेंबर रोजी दुपारी ४.३० च्या सुमारास झालेल्या अपघाती मृत्यूप्रकरणी स्थानिक पोलिसांनी एमएच २७ बीव्ही ०६४७ क्रमांकाच्या पांढऱ्या कारच्या चालकाविरुद्ध सायंकाळी ७ च्या सुमारास गुन्हा नोंदविला. या अपघातात तनु उमेश मंडवे (४, रा. काठीपुरा) या चिमुकलीचा उपचाराकरिता नेत असताना मृत्यू झाला होता.

----------

‘प्रभात’मध्ये अध्ययन साहित्य वितरण

अमरावती : स्थानिक खोलापुरी गेट येथील प्रभात एज्युकेशन सोसायटी स्थित यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्राचा सत्रारंभ व अध्ययन साहित्य वाटप १३ डिसेंबर रोजी करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीकांत नागरीकर, शेखर माळोदे, केंद्र संयोजक वि.दा.पवार, हनुमाननगर विकास समितीचे उपाध्यक्ष नरेंद्र राउत उपस्थित होते.

----------

दिव्यांगासाठी तक्रार निवारण अधिकारी घोषित

मोर्शी : दिव्यांग व्यक्ती अधिनियम २०१६ या अधिनियमातील तरतुदीन्वये दिव्यांगाच्या तक्रारीची योग्य दखल घेण्याच्या दृष्टीने विभाग, जिल्हा, तालुका व ग्रामस्तरावर तक्रार निवारण अधिकारी घोषित करण्यात आले आहेत. राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र देशमुख यांनी त्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

--------------

ऑफलाईन सिनेट सभेची मागणी

अमरावती : राज्य विधिमंडळाचे अधिवेशन ऑफलाईन तर मग सिनेट सभा ऑनलाईन का, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. एसओपीचे पालन करून ऑफलाईन सिनेट सभा आयोजित करावी, अशी मागणी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य मनीष गवई यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

-----------------