शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
4
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
7
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
8
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
9
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
10
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
11
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
12
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
13
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
14
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
15
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
16
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
17
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
18
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
19
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
20
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल

‘आक्रमण’चा सुनील गजभियेच मारेकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 12:09 AM

डोक्यावर लोखंडी रॉडने प्रहार करून सुनील गजभियेने शीतल पाटीलची हत्या केली आणि आम्ही दोघांनी तिचा मृतदेह एक्स्प्रेस हायवेवरील विहिरीत फेकून दिला, अशी कबुली आरोपी रहमान खान इब्राहिम खान पठाण याने गाडगेनगर पोलिसांना सोमवारी दिली.

ठळक मुद्देआरोपी रहमानची कबुली : डोक्यावर लोखंडी रॉडने प्रहार करून शीतल पाटीलला संपविले

आॅनलाईन लोकमतअमरावती : डोक्यावर लोखंडी रॉडने प्रहार करून सुनील गजभियेने शीतल पाटीलची हत्या केली आणि आम्ही दोघांनी तिचा मृतदेह एक्स्प्रेस हायवेवरील विहिरीत फेकून दिला, अशी कबुली आरोपी रहमान खान इब्राहिम खान पठाण याने गाडगेनगर पोलिसांना सोमवारी दिली. रहमानच्या अटकेनंतर हत्येचे गूढ उलगडण्यात पोलिसांना यश आले.शीतल पाटील व सुनील गजभिये यांच्यात संबंध होते. शीतल ही गजभियेसोबत राहण्यासाठी आग्रही होती. दीड वर्षांपासून यावरून त्यांचे वाद सुरू होते. त्यामुळे शीतलला संपविण्याचा सुनियोजित कट गजभियेने आखला. १३ मार्च रोजी ते एकत्र असताना पुन्हा वाद उफाळून आला. राजापेठ पोलीस ठाण्याजवळ कार उभी करून दोघेही आपसात वाद घालत होते. तेथून ते मालवीय चौकात आले. तेथे एका वाहनासोबत गजभियेच्या कारचा किरकोळ अपघात झाला. मात्र, गजभियेने नमते घेत वाद मिटविला. त्यानंतर पुन्हा कारमध्ये शीतल व सुनील शाब्दिक वाद करीत कठोरा नाक्यापर्यंत पोहोचले. शीतल ऐकत नसल्याचे पाहून गजभियेने रहमानला बोलावून घेतले आणि तुझ्या बहिणीला समजावून सांग, असे म्हणाला. रहमान दुचाकीने काही वेळातच नवसारीत पोहोचला. तिघेही नवसारीत एकत्र आल्यानंतर रहमानने शीतलला समजावण्याचे प्रयत्न केले. मात्र, आज निर्णय हवा, या भूमिकेवर ती ठाम होती. गजभियेला लग्नसमारंभाला जायचे होते. मात्र, शीतलने त्याची वाट अडविली. त्यानंतर गजभियेने त्याचा मोबाइल घरी नेऊन ठेवण्यास रहमानला सांगितले. त्यानुसार रहमानने गजभिये व त्याचाही मोबाइल घरी नेऊन ठेवला आणि तो पुन्हा नवसारीत आला. चांदूरबाजार रोडवर एका हॉटेलसमोर गजभियेने कार थांबवून रहमान व शीतलला ५०० रुपये देऊन काही खाण्यास सांगितले. गजभिये अर्ध्या तासानंतर परतल्यावर ते कठोरा मार्गे अमरावतीच्या दिशेने निघाले. यावेळीही वाद सुरूच होता. अमरावतीत पोहोचत असताना लघुशंकेच्या बहाण्याने गजभियेने कार थांबविली. त्यानंतर रहमान कार चालवीत होता, तर शीतल बाजूला होती. गजभिये मागील सीटवर जाऊन बसला. कार एक्स्पे्रस हायवेकडे जात असताना शीतलने आक्षेपार्ह शब्द वापरल्याने गजभियेचा संताप अनावर झाला. त्याने शीतलचे केस पकडले आणि डोक्यावर रॉडने दोन प्रहार केले. शीतल बेशुद्ध पडल्याचा त्याचा अंदाज होता; मात्र तेव्हाच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर गजभिये, रहमान कार घेऊन विहिरीजवळ थांबले आणि दोघांनी मृतदेह विहिरीत फेकला, अशी हकीकत रहमानने गाडगेनगर पोलिसांना सांगितली. त्याआधारे सोमवारी आयुक्तांनी हत्येचा उलगडा केला.आत्महत्येचा बनावसुनील गजभियेने शीतलच्या हत्येचा सुनियोजीत कट आखला होता. मोबाइल घरी नेऊन ठेवणे, खिशातून सुसाइड नोट काढून विहिरीवर ठेवणे हे सुनियोजित कट आखल्याचे पुरावे आहेत. शीतलची हत्या करून तिचा मृतदेह विहिरीत फेकून दिल्यानंतर गजभिये व रहमान हे दोघेही आपआपल्या घरी गेले. दुसऱ्या दिवशी १४ मार्च रोजी सकाळी गजभियेने रहमानच्या मोबाइलवर कॉल करून त्याला घरी रविनगर येथे बोलावले. गजभिये कार घेऊन घराबाहेरच उभा होता. दोघेही कारमध्ये बसून नांदगाव खंडेश्वर येथील शासकीय विश्रामगृहात गेले. आपल्या कृत्यावर पडदा पाडण्यासाठी शीतलने आत्महत्या केल्याचे सांगू, असे गजभियेने रहमानला सांगितले. सायंकाळपर्यंत चर्चा केल्यानंतर दोघेही घरी परतले.विहिरीत फेकला मोबाईलशीतल पाटीलचा मृतदेह विहिरीत फेकल्यानंतर गजभिये व रहमान तेथून निघाले आणि कार घेऊन काही अंतरावर थांबले होते. दरम्यान, शीतलचा मोबाइल आपल्याकडेच राहिला असल्याचे त्यांना आठवले. दोघेही परत विहिरीजवळ आले. गजभियेने शीतलचा मोबाइल विहिरीत फेकून दिला तसेच खिशातील चिठ्ठी काढून विहिरीवर ठेवली. १७ मार्च रोजी शीतलचा मृतदेह आढळून आला. ही चिठ्ठी शीतलने पूर्वीच त्याच्याकडे विश्वासाने सोपविल्याचे पुढे आले आहे.गजभिये अर्धा तास होता कुठे?१३ मार्च रोजी रात्री १०.२० वाजता शीतलचा मोबाइल बंद झाल्याचे पोलीस चौकशीत निदर्शनास आले. हा मोबाइल गजभियेने बंद करून ठेवला आणि त्या अर्धा तासात लोखंडी रॉडसुद्धा आणला असावा, असा संशय पोलिसांना आहे. मात्र, तो मंगल कार्यालयात गेला नव्हता. अर्ध्या तासाने परतल्यानंतर कारमधून न उतरता शीतल व रहमानला घेऊन अमरावतीच्या दिशेने आला.रात्री १२ वाजता सीपींच्या कक्षात चौकशीशीतल पाटील हत्याकांडातील मुख्य आरोपी सुनील गजभियेने गुन्ह्याची कबुली दिली नाही. दुसरा आरोपी रहमान पोलिसांच्या हाती लागल्यानंतर त्याची कसून चौकशी पोलिसांनी सुरू केली. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी या हत्याकांडाच्या चौकशीकरिता विशेष परिश्रम घेऊन गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांना दिशानिर्देश केले. त्यानुसार गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक शंकर डेडवाल हे रहमानची कसून चौकशी करीत होते. रविवारी रात्री १२ च्या सुमारास खुद्द पोलीस आयुक्त मंडलिक यांनी रहमानची चौकशी केली. त्यावेळी त्याने गुन्ह्याची कबुली दिली.गजभियेची पत्नी रहमानच्या संपर्कातशीतलच्या मृतदेहाचे १७ मार्च रोजी शवविच्छेदन होत असताना रहमान खान उपस्थित होता. शीतलच्या हत्येचा आरोप आपल्यावर होत असल्याचे कळताच रहमान तेथून मूर्तिजापूर व त्यानंतर ट्रकने मुंबईला गेला. गजभियेची पत्नी त्याच्या संपर्कात होती. त्याच्या बँक खात्यात तिने ३ हजार रुपये जमा केल्याचे पोलीस चौकशीत पुढे आले आहे.दोघांमध्ये दीड वर्षांपासून वाद सुरूहोता. कौटुंबिक वातावरण तणावाचे होते. त्यामुळे आरोपी गजभियेने सुनियोजित कट आखला. लोखंडी रॉड डोक्यावर मारून शीतलची हत्या केली आणि मृतदेह विहिरीत फेकला. याबाबत रहमानने कबुली दिली आहे.- दत्तात्रय मंडलिक, पोलीस आयुक्त.