लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : मंगळवारपासून सर्वदूर तुळशी विवाहाची लगबग सुरू झाली आहे. तुळशी विवाह होताच भारतीय परंपरेनुसार विवाहकार्याचा श्रीगणेशा होतो. त्यामुळे आता विवाह शुभ कार्याचा शुभारंभ होऊन, आजपासून मंगलकार्यालयांमधून सनई-चौघड्यांचे सूर ऐकू येणार आहे.यावर्षीच्या विवाह शुभारंभाचा पहिला मुहूर्त १ नोव्हेंबर ते ३० जून २०१८ या आठ महिन्यांच्या काळात ५९ विवाह शुभमुहूर्त आहेत. दुसरा टप्पा १८ जानेवारी २०१८ पासून तर ३० जून २०१८ पर्यंतचा आहे. यात ४५ विवाह मुहूर्त आहेत. या मुहूर्तानंतर संपन्न होणारे सर्व विवाह शुभदिनाच्या मुहूर्तावर होतात.विवाह मुहूर्ताच्या पहिल्या टप्प्यात मागील वर्षी लग्नाचा योग पावसाळ्यादरम्यान जुळून आलेल्या वधू-वरांना पालकांसाठी लगीनघाईचा असतो. तसेच उपवर मुलामलींचे पालक तुळशी विवाहानंतर, आपल्या मुला-मुलींसाठी उपवर-वधूच्या शोधात घराबाहेर पडतात. या सर्व लग्नांची जुळवाजुळव झाल्यानंतर हे विवाह समारंभ दुसºया टप्प्यात संपन्न होतात.विवाह मुहूर्ताच्या काळात वधू-वरांसाठी कापड खरेदी, दागिन्यांची खरेदी व इतरही संसारिक साहित्यांची खरेदी या काळात मोठ्या प्रमाणात होत असते. ही खरेदी लाखोंच्या घरात होते.रोजगार प्राप्तीचे साधनपहिल्या टप्प्यातील विवाह समारंभाच्या नियोजनाच्या तयारीत वर-वधू पिता गुंतले आहेत. त्यामुळे कॅटरर्स, मंडप व्यावसायिक, मंगल कार्यालये, बँड व्यावसायिक अशा विवाह समारंभांशी जुळलेल्या अनेकांना या दिवसांत मोठा रोजगार प्राप्त होतो. यात मोठी आर्थिक उलढाल होते.आग्रहाची परंपराअलीकडे स्वागत समारंभांसाठी, सेट डिझायनर येऊ लागले आहेत. त्याचप्रमाणे स्वरुची भोजनाची पद्धत रुढ झाल्यामुळे कॅटरिंंग व्यवसायालाही सुगीचे दिवस आले आहेत. परंतु ग्रामीण भागात मानसन्मानाने पाहुण्यांचे स्वागत करून, सन्मानपूर्वक आग्रहाचे जेवण देण्याची परंपरा या गतिमान युगात आजही कायम आहे.
आजपासून गुंजणार सनई चौघड्यांचे सूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2017 11:27 PM
मंगळवारपासून सर्वदूर तुळशी विवाहाची लगबग सुरू झाली आहे. तुळशी विवाह होताच भारतीय परंपरेनुसार विवाहकार्याचा श्रीगणेशा होतो.
ठळक मुद्देतुळशीविवाहाची धूम : विवाह शुभकार्याला सुरुवात, आठ महिन्यांत ५९ मुहूर्र्त