अमरावती: विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) येथे एका सहावर्षीय चिमुकल्याची तर एका सतरा वर्षीय मुलीची हृदयाची शस्त्रक्रिया यशस्वी करुन त्यांना नवे जीवनदान दिले आहे. पी.डी.ए डिव्हाईसच्या माध्यमातून पायाच्या नसामधून ही शस्त्रक्रिया करुन मुलांच्या हृदयाला असलेले छिद्र बुजविण्यात आले. या शस्त्रक्रियेनंतर दोन्ही मुलांची प्रकृती स्थिर असून सुधारणा होत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
जिल्ह्यातील सुकळी येथील रहिवासी असलेल्या सतरा वर्षीय मुलीला अचानक हृदयात दुखायला लागल्याने तीची तपासणी केली असता तिच्या हृदयाला ५ एमएमचे छिद्र असल्याचे निदान डॉक्टरांनी केली. तर दर्यापूर तालुक्यातील ६ वर्षीय चिमुकल्याच्या हृदयाला ३ एमएमचे छिद्र होते. अशा परिस्थितीमध्ये ओपन हार्ट सर्जरी किंवा पी.डी.ए डिव्हाईसने पायाच्या नसामधून शस्त्रक्रिया केली जाते. या दोघांवरही पायाच्या नसातून शस्त्रक्रिया करून हृदयाला असलेले छिद्र बंद करण्यात आले. ही शस्त्रक्रिया वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे, विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनामध्ये बालहृदय रोग तज्ञ डॉ.वैभव राऊत यांनी यशस्वी केली.
यावेळी त्यांना हृदयरोग तज्ज्ञ डॉ. आदीत्य गुप्ता, बधिरिकरण तज्ज्ञ डॉ . सपना अग्रवाल, डॉ. उज्वला मोहोड, डॉ. माधव ढोपरे, डॉ. प्रियंका कांबळे, डॉ.माधवी कासदेकर, डॉ. श्याम गावंडे, मिनल काणसे, परिचारिका दुर्गा घोडीले, अर्चना डगवार, प्रतीक इरखडे, वैभव भुरे, अपर्णा खडसे, पुजा गुल्हाने, पुजा इंगळे, कॅथलॅब टेक्निशियन यश धुरंधर, इसीजी विभाग सिमा शिरभाते, प्रसाद देशपांडे, समाजसेवा अधिक्षक शितल बोंडे, अमोल वाडेकर, पंकज पिहुलकर, ममता तायडे, संजीव मोहकार यांनी सहकार्य केले.