१४ टक्के मोठा : ३० टक्के प्रकाशमानअमरावती : १४ नोव्हेंबर रोजी पृथ्वीपासून चंद्राचे अंतर सरासरी कमी होत असल्याने ‘सुपरमून’ दिसणार आहे़ १४ नोव्हेंबर रोजी पृथ्वी-चंद्र हे अंतर ३,५६,५१२ किलोमीटर राहील़ नेहमी हे अंतर सरासरी ३ लाख ८५ हजार कि़मी़ असते़ या दिवशी पृथ्वी - चंद्र हे अंतर कमी असल्याने चंद्र नेहमीपेक्षा सरारसरी १४ टक्क्यांनी मोठा दिसतो व ३० टक्क्यांनी प्रकाशमान दिसेल़ यानंतर सुपरमून २५ नोव्हेंबर २०३४ रोजी दिसणार आहे.चंद्र पृथ्वीच्या जवळ असल्याने समुद्राच्या भरती-ओहोटीची तीव्रता वाढणे, वादळ यांसरख्या घटना घडू शकतात़ पृथ्वीवरून चंद्राचा आपल्याला फक्त ५९ टक्केच भाग पाहता येतो़ चंद्रावरून पृथ्वी ही ९८़४ टक्के दिसू शकते़ चंद्रापासून पृथ्वीवर प्रकाशकिरण येण्यासाठी १़३ सेकंद लागतात़ चंद्राचे वय ४़६५ अब्ज वर्षे आहे़ दर वर्षाला चंद्र पृथ्वीपासून ३़८ सेमी लांब जात आहे़ त्यामुळे पृथ्वीचा फिरण्याचा वेग कमी होईल व १०० वर्षांनी हा २ मिली सेकंदने मोठा होईल़ चंद्रावर ३० हजार विवरे असून, १२ व १०० वर्षांनी दिवस हा २ मिलीसेकंदने मोठा होईल़ चंद्रावर ३० हजार विवरे असून १२ पर्वत आहेत़ चंद्रावरील विवरे व पर्वत दुर्बिणीतून अगदी चांगल्या प्रकारे पाहता येतात़१४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी दिसणारा सुपरमून खगोलप्रेमिंनी व जिज्ञासूंनी अवश्य बघावा़ हा सुपरमून अगदी साध्या डोळ्यांनी पाहता येईल, अशी माहिती मराठी विज्ञान परिषद, अमरावतीचे हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर व प्रवीण गुन्हाने यांनी केले आहे़ (प्रतिनिधी)
१४ नोव्हेंबरला दिसणार ‘सुपरमून’
By admin | Published: November 12, 2016 12:21 AM