किसान संघर्ष समितीसह विविध पक्ष संघटनांचा सहभाग
अमरावती : केंद्र शासनाने मंजूर केलेली कृषी विधेयके रद्द करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी दिल्ली येथे १६ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी किसान संघर्ष समिती, वंचित बहुजन आघाडी व अन्य पक्ष तसेच संघटनांनी धरणे दिली. यावेळी केंद्र सरकारने पारीत केलेले तीनही शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारकडे पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. आंदोलनात तुकाराम भस्मे, अशोक सोनारकर, अलीम पटेल, सुभाष पांडे, सिद्धार्थ गायकवाड, विजय रोडगे, विनोद जोशी, आनंद आमले, संजय पांडव, सुनील घटाळे, रोशन अर्डक, रवि पडोळे, प्रवीण मोहोड, अमर मकेश्वर, लक्ष्मण धाकडे, महेश देशमुख, चंद्रकांत बानुबाकोडे, जे.एम. कोठारी, शरद मंगळे, राजेंद्र भांबोरे, रमेश सोनुले, बाळासाहेब कुटेमाटे, हरिदास राजगिरे, अतुल वानखडे, शंतनु जगताप, संतोष रंगे, निळकंठ ढोके, नंदू नेतनराव, दिगंबर नगेकर, सागर दुर्याेधन, राहुल कडू, प्रकाश सोनोने, चंद्रकांत वडसकर, संजय ठाकरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.