शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
4
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
5
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
6
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
7
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
8
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
9
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
10
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
11
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
12
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
13
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
14
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
15
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
16
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
17
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
18
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
19
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
20
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 

युवा सेनेच्या आंदोलनाला ‘राणा लँडमार्क’ पीडितांचे समर्थन

By admin | Published: January 29, 2015 10:58 PM

शहर आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश अणे यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी सुरू असलेल्या युवा सेनेच्या उपोषणाला गुरुवारी राणा लँडमार्क प्रकरणातील पीडित नागरिकांनी पाठिंबा दिला.

अमरावती : शहर आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश अणे यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी सुरू असलेल्या युवा सेनेच्या उपोषणाला गुरुवारी राणा लँडमार्क प्रकरणातील पीडित नागरिकांनी पाठिंबा दिला. उपोषण मंडपात त्यांनी दिवसभर ठिय्या दिला. यात महिलांचाही समावेश होता.घरकुलाचे स्वप्न दाखवून कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या राणा लॅन्डमार्क्स प्रा. लि.च्या संचालकांना पसार होण्याची संधी देणारे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश अणे यांना सेवेतून बरखास्त करावे आणि चौकशीअंती त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे या मागणीचे निवेदन गुंतवणूकदारांनी सायंकाळी गृहराज्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले. गुंतवणूकदारांचा फसवणुकीचा आरोपशहरात फ्लॅट्स व प्लॉट विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या राणा लॅन्डमार्क्स प्रा. लि. या कंपनीने सुमारे ९६१ गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात ४१६ तक्रारी दाखल आहेत. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश अणे यांनी आमच्याकडून रोख रक्कम घेऊन योगेश राणा यांच्या सह्यांचे इसारचिठ्ठ्यांचे मुद्रांक देणारा चंद्रशेखर राणा याला आरोपी करण्याऐवजी त्याला फरार होण्याची संधी दिली. चंद्रशेखर राणा, योगेश राणा व इतर संचालकांची मालमत्ता जप्त करण्याबाबत जाणूनबुजून दिरंगाई केली असे आरोप निवेदनात करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्तांची अणे यांच्याबाबतची भूमिका संयशास्पद असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. ३१ जणांच्या सह्या असलेल्या या निवेदनाच्या प्रतिलिपी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस महासंचालक यांनाही उल्लेखित करण्यात आल्या आहेत.